ग्रामीण भागाच्या विकासाला न्याय मिळत आहे – आशुतोष काळे

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीच्या सभापती,उपसभापति व सर्व सदस्य मनापासून काम करीत असल्यामुळे विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असलेल्या निधीच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे मार्गी लागल्यामुळे ख-या अर्थाने ग्रामीण भागाच्या विकासाला न्याय मिळत असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले.कोपरगाव तालुक्यातील मंजूर व कारवाडी येथे जिल्हा नियोजन अंतर्गत जी.प. सदस्य सुधाकर दंडवते यांच्या विकास निधीतून मंजूर झालेल्या जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे कामांचे भूमिपूजन युवानेते आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना युवानेते आशुतोष काळे म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सत्ता आल्यापासून सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत. तालुक्यामध्ये विकासकामांचा धडाका सुरू आहे.यापुढेही विकासकामांची वेग असाच सुरु राहणार असल्याची ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे,पंचायत समिती सभापती अनुसयाताई होन, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, जी.प. सदस्य सुधाकर दंडवते,उपसभापती अनिल कदम, कारखान्याचे संचालक अशोक तिरसे, सचिन चांदगुडे, मिननाथ बारगळ, गौतम बँकेचे संचालक दिलीप पायमोडे, दिलीप चांदगुडे, वसंतराव दंडवते, विक्रम कोकाटे, रोहिदास होन, राहुल रोहमारे,राहुल जगधने,मंजुरच्या सरपंच सौ.उषाताई जामदार, वडगावचे सरपंच सोमनाथ कांगणे, संदीप जाधव, किशोर डोंगरे, कारवाडीच्या सरपंच रुपालीताई माळी, विठ्ठल जामदार, देवराम गावंड, भिकाजी सोनवणे, पुरोषत्तम बोरावके, नरहरी गावंड, साहेबराव सोनवणे, दादासाहेब मोरे, यु. सी. पवार, ए. आर. गावडे, ग्रामसेवक पी. एम. भिसे, मान्यवर तसेच कारवाडी, मंजूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एम. वांनी यांनी केले तर आभार अशोकराव मोरे यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram