प्रियदर्शनी महिला मंडळ आयोजित जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद प्रमाणे याहीवर्षी नवरात्र उत्सवानिमित्त कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव काळात जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये बुधवार दिनांक १०/१०/२०१६ रोजो सकाळी १२.०० वाजता विधिवत घटस्थापना करण्यात आली. जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रमासाठी कोपरगाव शहरातील वनिता महिला मंडळ,ब्राम्हण समाज जेष्ठ महिला मंडळ, गुजराथी महिला मंडळ, सिंधी समाज पंजाबी महिला मंडळ, माहेश्वरी महिला मंडळ तसेच शहरातील विविध मंडळाच्या महिल नियमितपणे कार्यक्रमास हजर होत्या. दररोज नियमितपणे १२.०० ते २.०० या वेळेत देवीचे पाठ वाचन करण्यात येत असून सायंकाळी ७ ते १० या वेळेत दांडिया चे आयोजन करण्यात आले आहे दांडियासाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे. शनिवार दिनांक १३/१०/२०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेवून विजेत्या महिलांना मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते पैठणीचे बक्षीस देण्यात आले. सोमवार १५ /१०/२०१८ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत पार पडलेल्या फॅशन शो मध्ये महिला व युवतींनी सहभाग घेतला यामध्ये मंगळवार दिनांक १६/१०/२०१८ रोजी कुंकुम आर्चन व १७/१०/२०१८ रोजी अष्टमीच्या दिवशी शतचंडी होम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी सभापती सौ.अनुसयाताई होन, सौ.मीनल खांबेकर,सौ. प्रतिभाताई शिलेदार, सौ.स्वप्नजाताई वाबळे, सौ. वर्षाताई गंगुले, सौ. माधवीताई वाकचौरे, सौ. सौ. नेत्रा कुलकर्णी, सौ. रजनीताई गुजराथी, सौ. पुष्पा पडियार, सौ.मायादेवी खरे, सौ. सीमा पानगव्हाणे, सौ. वर्षा कापसे, सौ. स्वाती काळे, सौ. सुनिता खैरनार, सौ. वर्षा नानकर, सौ. निर्मला मालपुरे, सौ. संगीता शेलार, सौ.संगीता चव्हाण, सौ. संगीता रोहमारे, सौ. वेदिका गवारे, सौ. चंद्रकला त्याहारे, सौ. शोभा आहेर. सौ. रंजना काळे, सौ. शीतल काळे, सौ. सुजाता गाडे, सौ. सुशीला वाणी, सौ. सुरेखा शिंदे, सौ. मनीषा गोरे, सौ. शालिनी साळुंखे, सौ. प्राची उदावंत, सौ. नीता कुलकर्णी, सुरेखा सारंगधर, सौ. प्रियंका माडीवाले, सौ. वंदना बोरनारे आदींसह प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram