गावाच्या विकासासाठी एकदिलाने काम करा – आशुतोष काळे

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी मिळणा-या निधीमध्ये शासनाने मोठी कपात केली आहे. त्यामुळे निधी आणण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीच्या सभापती, उपसभापति व सदस्य प्रयत्नांची पराकाष्टा करून निधी मिळवत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होत आहे. ग्रामविकासासाठी कायम मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होवू शकत नाही. त्यासाठी गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे मायगाव देवी चौफुली ते मायगाव देवी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते होते. ते पुढे म्हणाले की, ज्यांच्याकडे वर्षानुवर्ष पंचायत समितीची व जिल्हा परिषदेच्या चारही गटाची सत्ता होती त्यांना यापूर्वी मोठ्या प्रमाणात निधीही मिळत असूनही विकासाची मानसिकता नसल्यामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. आजही कोपरगाव तालुक्यात विकासाचा दुष्काळ आहे.कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जे काही विकास कामे सुरु आहेत ते फक्त जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सुरु आहे.त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी सर्वांनी सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन केले. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सौ.अनुसयाताई होन,राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कोपरगाव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, जिल्हा परिषद सदस्य सोनालीताई रोहमारे, उपसभापति अनिल कदम, गटनेते अर्जुनराव काळे, सदस्य पोर्णिमा जगधने, नारायणराव मांजरे, काळे कारखान्याचे संचालक ज्ञानदेव मांजरे,पुंडलिक माळी, भागवतराव माळी, रोहिदास होन, राहुल रोहमारे, राहुल जगधने, सुदामराव गाडे, कृष्णराव गाडे, मायगाव देवीच्या सरपंच सौ. बिजलाबाई साबळे, उपसरपंच संजय गाडे, नामदेव साबळे, प्रभाकर गाडे, अनंतराव गाडे, साहेबराव गाडे, बाबासाहेब गाडे, शिवाजीराव नाजगड, धोंडीराम गाडे, दिलीप गाडे, बाळासाहेब गाडे, आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram