ऊस दराची चिंता करू नका पहिला हप्ता २३००/- रुपये देऊन त्यावर थांबणार नाही – आशुतोष काळे

उस दराबाबत शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे एफ. आर. पी. ऊस दर देणे बंधनकारक असतांना माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी ऊस उत्पादक शेतक-यांचे हक्क अबाधित ठेवून शेतक-यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून आजपर्यंत एफ. आर.पी. पेक्षा जादा दर दिलेला आहे. याहीवर्षी २०१८-१९ च्या गळीत हंगामात येणा-या ऊसाला पहिला हप्ता २३००/- रुपये देणार असून शेतक-यांनी ऊस दराची चिंता करू नका फक्त २,३००/- रुपये दर देवून थांबणार नाही इतर साखर कारखान्यांच्या ऊस दराचा विचार उर्वरित अतिरिक्त रक्कम देवून ऊस उत्पादक शेतक-यांना जास्तीत जास्त ऊस दर देणार असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०१८-१९ या वर्षाच्या ६४ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ संचालक व प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे होते. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१८-१९ या वर्षाच्या ६४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला.याप्रसंगी बोलतांना ते पुढे म्हणाले की, मागील दोन ते तीन वर्षापासून शेतकरी महागाई मुळे त्रस्त झाला आहे. रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये १५० ते २०० रुपयांची वाढ झालेली आहे. विजेच्या दरामध्येही वाढ झाल्याने कृषी पंपाचे वीजबिल वाढले आहे. पेट्रोल व डीझेलच्या दरात रोज होत असलेल्या वाढीमुळे शेतीच्या मशागती खर्चात वाढ झाली आहे. सबका साथ सबका विकास अशा घोषणा जरी सरकार देत असले तरी शेतीचा व्यवस्थापन खर्च आवाक्याबाहेर गेल्यामुळे शेतक-यांचा विकास झालेला दिसत नाही. उत्तर प्रदेशमध्ये मे २०१८ मध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या तीनही उमेदवारांना ऊस उत्पादक शेतक-यांच्या रोषामुळे पराभव पत्करावा लागला त्यामुळे खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने साखर उद्योगाची जान असलेल्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांशी देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी व नामदार नितीन गडकरी यांनी बैठका घेवून साखर उद्योगाच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. त्यामुळे येत्या चार ते पाच महिन्यात साखर उद्योगाला दिलासा देणारे निर्णय झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या www.karmaveerkalesugar.com या संकेतस्थळाचे उदघाटन करण्यात आले. या संकेतस्थळावरून या संकेतस्थळावर शेतक-यांना नोंद या सदराखाली उसाच्या सन २०१७-१८ ते संन २०१९-२० पर्यंत संपूर्ण नोंदी पहाता येणार असून गाववार, गटानुसार व तारखेनुसार उस नोंदी सुद्धा पाहायला मिळणार आहेत. गळीत हंगाम या सदराखाली उस गळीत यादीमध्ये तारखेप्रमाणे उस गाळप यादी शिफ्टप्रमाणे व गटवार गाळप पहाता येणार आहे. शेतकरी या सदराखाली शेतक-यांना कारखान्याने दिलेला कोड नंबर प्रमाणे शेतकरी आपला वैयक्तिक खातेउतारा सिझनप्रमाणे पाहू शकणार आहे. त्यामुळे शेतक-यांना कारखान्याच्या गाळप संदर्भ व इतर माहिती घरबसल्या आपल्या मोबाईल व संगणकावर पाहायला मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कारखान्याने सभासदांना अद्ययावत माहिती देण्यासाठी टाकलेले हे पुढचे पाऊल आहे. कोपरगाव तालुक्यात सुरु असलेल्या वीज भारनियमन वेळापत्रकामध्ये बदल करून शेतक-यांना दिवसा पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, बोंड अळीच्या नुकसान भरपाई पासून वंचित असणा-या शेतक-यांना तातडीने भरपाई मिळावी व शेतक-यांचे मागील रब्बीचे अनुदान मिळावे यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय ण आल्यास सोमवार दिनांक २२/१०/२०१८ पासून आमरण उपोषणास बसणार असून उपोषणास पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले. याप्रसंगी कारभारी जाधव, छबुराव आव्हाड, सुधाकर आवारे, कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, सर्व संचालक मंडळ, सभापती सौ. अनुसयाताई होन, संलग्न संस्थांचे चेअरमन, पदाधिकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप ,आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर जयंतराव भिडे, सेक्रेटरी सुनील कोल्हे, ऑफिस सुपरिटेडेट बाबा सय्यद, वर्क्स मॅनेजर दौलतराव चव्हाण, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चिफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे उपसभापती, सर्व सदस्य, कोपरगाव नगर परिषदेचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक व पदाधिका-यांसह सभासद, शेतकरी व कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर उपाध्य्यक्ष सुनील शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram