शब्दात बदल नको अन्यथा पुन्हा उपोषण करू - आशुतोष काळे.

दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत कोपरगाव तालुक्याचा सामावेश करण्यात यावा या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सुरु केलेले उपोषण दुस-या दिवशी प्रांताधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हाताने लिंबू सरबत घेवून सोडते यावेळी प्रशानाने दिलेला शब्द पाळावा अन्यथा पुन्हा उपोषण करू असा ईशारा प्रशासनाला दिला आहे. कोपरगाव तालुक्याला दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करावे या प्रमुख मागणीसह कोपरगाव तालुक्यातील शेतक-यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी युवा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमरण उपोषण सुरु केले होते. जिल्हाधिका-यांनी वस्तुस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठविला असलयाचे लेखी पत्र देवून दुष्काळ जाहीर होणार असल्याचे आश्वासन दिले, तसेच दिवाळी पर्यंत शेतक-यांना बॉंड अळीचे पैसे देणार, विजेचे सुधारित वेळापत्रक तयार करणार , कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणा-या चार नंबर साठवण तलावाच्या कामासाठी जनरल बोर्डाच्या मिटिंगमध्ये १४ व्या वित्त पैसे मंजूर करून घेणार, २०१५ च्या रब्बीचे अनुदान देणार असे आश्वासन दिल्यानंतर आशुतोष काळे यांनी उपोषण सोडण्यात आले. यावेळी अचानक राजकीय सहानुभूती घेण्यासाठी आलेल्या कोपरगाव तालुक्याच्या आमदार यांनी माईकवर बोलण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांनी त्यांना बोलुच दिले नाही. कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरजोरात घोषणा देणे सुरु केले त्यावेळी आमदार कोल्हे यांच्यावर उपोषण स्थळावरून निघून जाण्याची नामुष्की ओढवली. यावेळी प्रांताधिकारी रविंद्र ठाकरे म्हणाले की, प्रशासनाला आशुतोष काळे आमरण उपोषणाला बसल्यानंतर सत्य परिस्थिती समजली. त्यांनी शेतक-यांसाठी व सर्व सामान्य जनतेसाठी शासनाचे दार ठोठावले त्यामुळे आम्ही तातडीने सत्य परिस्थितीचा अहवाल सादर करून शासनाकडे पाठविला असून लवकरच कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होण्यासाठी सर्वतोपरी आश्वासन दिले. त्यावेळी आशुतोष काळे म्हणाले की, मी आमरण उपोषण करतोय ही माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी कोपरगाव तालुक्याची सत्य परिस्थितीची माहिती घेवून जो प्रस्ताव शासनाकडे पाठविला तयची सत्यता पडताळून उपोषण मागे घेतले असल्याचे सांगितले. दरम्यान दुपारी आशुतोष काळे यांच्या सोबत उपोषणाला बसलेल्या विष्णू शिंदे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, तालिबभाई सय्यद या तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळ त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आशुतोष काळे यांची प्रकृती स्थिर राहावी यासाठी कार्यकर्त्यांनी शहर व तालुक्यात विविध मंदिरात होम हवन व पूजा केल्या. आशुतोष काळे यांच्या उपोषणाच्या दुस-या दिवशी अचानक तीन उपोषणकर्त्यांची प्रकुती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात हालविण्यात आले, ही परिस्थिती कोपरगाव शहर व तालुक्यात सोशल मिडीयाच्या माध्यमातून व वृत्त वाहिनीच्या बातमीपत्रातून वा-यासारखी पसरताच कोपरगाव शहर व तालुक्यामध्ये युवा नेते आशुतोष काळे यांची प्रकृती स्थिर राहावी यासाठी मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा येथे पार्थना करण्यात आल्या. यामध्ये कोपरगाव शहरातील गुरुद्वारा, वाकडी येथील जागृत देवस्थान खंडोबा मंदीर,मयूरेश्वर मंदिर पोहेगाव, राघवेश्वर मंदिर कुंभारी,रेणुकामाता मंदिर मायगाव देवी, जगदंबा मंदिर ब्राम्हणगाव, हनुमान मंदिर मढी बु.,कोपरगाव येथील मस्जिद मध्ये मुस्लीम बांधवांनी, बौद्ध विहार सुरेगाव आदी ठिकाणी युवानेते आशुतोष काळे यांची प्रकृती स्थिर राहण्यासाठी विविध धर्मियांच्या वतीने सामुहिक पार्थना करण्यात आली. आशुतोष काळे यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाच्या दुस-या दिवशीही कार्यकर्त्यांचे लोंढे उपोषणस्थळी मोठया संख्येने येत होते. उपोषणाच्या पहिल्या दिवशी रात्री भजन करून कार्यर्त्यानी रात्र जागविली. उपोषणाच्या दुस-या दिवशीही पहिल्या दिवसाप्रमाणेच शहर वं तालुक्यातील विविध संघटना पाठींबा देण्यासाठी आपल्या संघटनेच्या पदाधिका-यांसह उपोषणस्थळी येत होते. कोपरगाव तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी आपल्या गावाट दुष्काळ जाहीर करावा अशा आशयाचे ठराव उपोषणस्थळी देवून आंदोलनाला पाठींबा दिला. तसेच नरेंद्र मोदी विचारमंच,कोपरगाव डॉक्टर असोसिएशन, सुवर्णकार समाज कोपरगाव, भिमशांती मित्र मंडळ, अदिवासी उन्नती बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटना,संत जगनाडे महाराज सेवाभावी संस्था,कोपरगाव कोपरगाव तालुका परीट सेवा मंडळ कोपरगाव,दि इंजिनिअर अँड काँट्रॅकटर असोसिएशन,कोपरगाव तालुका सकल शिंपी समाज,मराठा आरक्षण क्रांती मोर्चा कोपरगाव,स्वाभिमानी पक्ष तथा युथ रिपब्लिकन पार्टी, लहुजी टायगर सेना, कहार भाजी विक्रेते संघटना,आम आदमी पार्टी, अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस संघ,कान्हेश्वर महिला बचत गट आदी संघटनांनी उपोषण स्थळी येवून जाहीर पाठींबा दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, नगराध्यक्ष- विजय वहाडणे, सुभाष दवंगे, अॅड. अरुण कडू आदी मान्यवरांसह शेतकरी व्यापारी वं नागरिकांनी तीव्र स्वरुपात निषेध नोंदविला.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram