धोंडेवाडीच्या नागरिकांना युवा नेते आशुतोष काळे यांनी मिळवून दिला न्याय

कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी गावाची गावठाण हद्द अतिशय कमी असल्यामुळे बहुसंख्य नागरिक मागील काही दशकापासून ग्रामसभेच्या अधिकृत ठरावाणे शासकीय जमिनीवर घरे बांधून रहात होती. सन २००२ मध्ये माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी मा. जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे धोंडेवाडी गावालगत असलेली शासकीय जमीन गट नंबर ४४७ व ४४८ मधील एकूण क्षेत्र ४ हेक्टर ९० आर हे धोंडेवाडी गावालगतचे क्षेत्र धोंडेवाडी गावच्या लोकांना गावठाण कमी पडत असल्यामुळे सदरचे क्षेत्र गावठाणामध्ये वर्ग करावे अशी मागणी केलेली होती. अनेक वर्ष होऊनही या अतिक्रमण धारक नागरिकांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळत नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते आशुतोष काळे यांच्याकडे आपली कैफियत मांडून आम्हाला न्याय मिळवून द्या असे साकडे घातले. त्यावेळी मा.ना. औरंगाबाद खंडपिठात युवानेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत असे नमूद करण्यात आले होते की, धोंडेवाडीचे हे नागरिक पिढ्या न पिढ्यापासून रहात असलेल्या शासकीय जमिनीची घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती आदी कर ग्रामपंचायतकडे नियमित पणे भरत आहेत. ग्रामपंचायतीने या व्यक्तीना नळ पाणी पुरवठा, गटारी आदी सोयीसुविधा दिलेल्या आहेत. धोंडेवाडी ग्रामपंचायतीने मासिक सभेत व ग्रामसभेत वेळोवेळी सदरची शासकीय जमीन गावठाणामध्ये वर्ग करण्याचे ठरावही पारित केलेले आहे. अशी परिस्थिती असूनही काही असंतुष्ट व विघ्नसंतोषी व्यक्तींनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करून सदरच्या शासकीय जागेत रहात असलेल्या लोकांचे अतिक्रमणे काढून घ्यावे अशी याचिका दाखल केलेली होती. त्यामुळे हे नागरिक सतत तणावाखाली रहात होते. युवानेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आलेल्या याचिका क्र. ९१९९/२०१८ ची मा.ना. खंडपीठाने दखल घेत प्रतिवादींना नोटीसा काढून त्यांची बाजू मांडण्यास सांगितले होते. दोनही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मा.ना. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिनांक १/११/२०१८ रोजी मा. जिल्हाधिकारी अहमदनगर यांना १६ आठवड्यात सदरची अतिक्रमणे नियमाकुल करणेबाबतचा ग्रामस्थांचा प्रस्ताव मंजूर करावा असे आदेश केले आहेत. त्यामुळे धोंडेवाडीच्या शासकीय जागेवर रहात असलेल्या ७३ कुटुंबांना युवानेते आशुतोष काळे यांच्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी नुकतेच कारखाना कार्यस्थळावर येऊन स्वताच्या हक्काची जागा मिळवून दिल्याबद्दल आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत. यावेळी कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, संचालक सचिन रोहमारे, अशोक नेहे, सुभाष दरेकर, नानासाहेब नेहे, बाबासाहेब नेहे, दिलीप नेहे, ज्ञानदेव नेहे, किशोर नेहे, प्रभाकर नेहे, शिवाजी नेहे, सुभाष मैड, भिकाजी नेहे, शिवाजी मैड, मच्छिन्द्र दरेकर, कैलास कांडेकर, राजेंद्र नेहे, शिवाजी नेहे, जयंत वामन, दिगंबर नेहे, पोपट नेहे, गोरख नेहे, रामनाथ भालेराव, बबन वाकचौरे, विजय थेटे, भानुदास दरेकर, अमोल थोरात आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram