मागेल त्या गावाला तातडीने पाण्याचे टँकर द्या आशुतोष काळेंच्या अधिकारी, पदाधिका-यांना सुचना

संपूर्ण कोपरगाव तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून सध्या रांजणगाव देशमुख येथे एक पाण्याचा टँकर सुरु आहे मात्र काही दिवसातच पाण्याच्या टँकरची मागणी वाढणार असून अधिकारी व पदाधिकारी यांनी दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेवून ज्या गावाचा पाण्याच्या टँकरची मागणी असेल त्या गावाला पाण्याचे टँकर द्या अशा सुचना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी पार पडलेल्या बैठकीत अधिकारी, पदाधिका-यांना दिल्या आहे. कोपरगाव येथे युवा नेते आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव तालुक्यामध्ये निर्माण होणा-या संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीत आवश्यक असणा-या उपाय योजनांबाबत आढावा बैठक घेतली. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, जिल्हा परिषद सदस्य सौ. सोनाली रोहमारे, कारभारी आगवन, प्रसाद साबळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, प्रशांत वाबळे, रोहिदास होन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी राजेंद्र पंडोरे,सहाय्यक गटविकास अधिकारी एम. एस.वळवी, उपअभियंता उत्तम पवार, ग्रामपंचायत विभाग विस्तार अधिकारी सुनील माळी, डी.ओ.रानमाळ, टंचाई बिभाग अजय धुमाळ, शाखा अभियंता अश्विन वाघ आदी उपस्थित होते. याप्रसंगी युवा नेते आशुतोष काळे म्हणाले की, यावर्षी कोपरगाव तालुक्यात अतिशय अत्यल्प पाऊस पडल्यामुळे मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. मनेगाव, अंजनापुर, धोंडेवाडी, काकडी, मल्हारवाडी या गावांचे पाण्याच्या टँकरचे प्रस्ताव शासनाकडे पाठवविले आहेत. भविष्यात काही दिवसातच उक्कडगाव, वेस, सोयेगाव, तीळवणी, बहादरपूर, मढी बु. आदी गावांना पिण्याच्या पाण्याच्या टँकरची आवश्यकता भासणार आहे. या व्यतिरिक्त कोपरगाव तालुक्यातील ज्या ज्या गावांचा व वाड्या-वस्त्यांची टँकरची गरज भासणार आहे. ज्या गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे किंवा होऊ शकते अशा गावातील सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावे. सदर प्रस्तावाची पदाधिकारी व अधिका-यांनी तातडीने दखल घ्यावी. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशी सक्त ताकीदही यावेळी त्यांनी दिली. कोपरगाव तालुक्यात एकूण ९० हातपंप बंद असून त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून हे हातपंप तात्काळ सुरु करण्यासाठी अधिका-यांनी तातडीने पावले उचलावी. यावेळी आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव, कोळपेवाडी, मंजूर, शहाजापूर, येसगाव, जेऊर कुंभारी, रवंदे, मळेगाव थडी, कुंभारी, वारी, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, सोयेगाव, वेस, मनेगाव, आदी गावातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामाचा आढावा घेतला व ज्या गावातील पाणी पुरवठा योजनांचे काम संथगतीने सुरु आहे त्या योजनांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुचना केल्या. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकरणाच्या माध्यमातून सुरु असलेल्या पाणी वितरण व्यवस्थेच्या कामाचा आढावा घेवून ही कामे लवकरात लवकर पूर्ण कसे होतील यासाठी ग्रामसेवक, सरपंच सदस्य यांनी जातीने लक्ष घालावे अशा सुचना केल्या. कोपरगाव तालुक्याच्या प्रत्येक मंडलाचा सर्व्हे करून कोपरगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करावे यासाठी केलेल्या आमरण उपोषणामुळे दुष्काळाच्या यादीत दहेगाव बोलका मंडलाचा समावेश झाला आहे. दुष्काळाबाबतच्या उपाय योजना लवकरच या मंडलामध्ये सुरु होतील परंतु कोपरगाव तालुक्यात सर्वत्रच दुष्काळजन्य परिस्थिती असून याबाबत शासनाने आपले धोरण लवकरात लवकर जाहीर करावे अशी आशुतोष काळे यांनी मागणी केली.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram