मिझल रुबेला लसीकरण मोहिमेचा लाभ घ्या – आशुतोष काळे

पंचायत समिती कोपरगाव व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कोपरगाव कोपरगाव यांच्यावतीने मंगळवार दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ पासून मिझल रुबेला लसीकरण मोहीम मोफत राबविण्यात येणार असून या लसीकरण माहिमेचा कोपरगाव तालुक्यातील ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांनी लाभ घ्यावा असे आव्हान कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते आशुतोषदादा काळे यांनी केले आहे.यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे व वातावरणात झालेल्या बदलामुळे मागील काही महिन्यात अनेक लहान मुलांना व नागरिकांना अनेक व्याधींना समारे जावे लागले असतांना रोज नवनवीन आजारांचे शोध लागत आहेत. यामध्ये अतिशय वेगाने पसरणा-या मिझल रुबेला या आजारांची भर पडली आहे. मिझल व रुबेला आजारापासून बचाव करण्यासाठी मिझल रुबेला एकत्रित लस देण्यात आहे. मिझल या आजाराला गोवर म्हटले जाते. मिझल व रुबेला या आजारामुळे बाळामध्ये जन्मताच व्यंग निर्माण होते. या आजारांची लहान मुलांना लागण होऊ नये यासाठी मिझल रुबेला लसीकरण मोहीम दिनांक २७ नोव्हेंबरपासून कोपरगाव तालुक्यात हाती घेण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील एकूण २७३ शाळांमधील ६२,५३० विद्यार्थ्याना ही लस देण्यात येणार आहे. कोपरगाव तालुक्यातील एकूण २५८ अंगणवाडी व प्रिप्रायमरी किंडर स्कुलमधील २६,८०७ बालकांना ही लस देण्यात येणार आहे.तसेच ही मोहीम पहिल्या दोन आठवड्यांमध्ये शाळेत व त्यापुढील दोन आठवड्यांमध्ये अंगणवाडी स्तरावर राबविण्यात येणार आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्र व कोपरगाव शहरातील १ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यामार्फत पंचायत समिती कोपरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे.तरी सर्व जागरूक नागरिकांनी आपल्या ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या बालकांना मिझल रुबेला लसीकरण करून घेवून सुदृढ पिढी निर्माण होण्यासाठी या माहिमेत सहभागी व्हावे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील उपाध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले पाटील यांचे सहकार्य लाभणार असून पंचायत समितीच्या माध्यमातून ही लस मोफत देण्यात येणार आहे तरी पालकांनी आपल्या ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या सर्व मुलांचे आवर्जून लसीकरण करून घ्घावे असे आवाहन आशुतोष काळे यांनी केले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram