एकही शेतकरी पाण्यापासून वंचित राहता कामा नये अन्यथा रस्त्यावर उतरू शेतक-यांनी माझ्यासोबत संघर्षासाठी तयार राहावे –आशुतोष काळे

गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात यावर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती आहे. खरीप हंगाम तर पूर्णपणे वाया गेला परंतु भविष्यात गोदावरी कालव्याचे आवर्तन मिळणार या आशेवर शेतक-यांनी विहीर, बोअरवेल च्या माध्यमातून मिळेल त्या पाण्यावर आपली मका, गहू, हरबरा, कांदा, व चारा पिकांची लागवड केली आहे.परंतु पाटबंधारे विभागाने अडीच किलोमीटर पर्यंतच्या शेतीलाच पाणी देणार असल्याचा तुघलकी निर्णय जाहीर केला आहे. परंतु कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत असा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. पाटबंधारे खात्याने पोलिसांची कवचकुंडले वापरून कोल्हापूर टाईप बंधा-यातील पाणी खाली सोडून गोदाकाठच्या शेतक-यांवर अन्याय केलाच आहे व आता आवर्तनातून फक्त अडीच किलोमीटर पर्यंतच्या शेतीला सिंचनासाठी पाणी देणार हे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. पाटबंधारे विभागाने हेडपासून टेलपर्यंतच्या शेतक-यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. उन्हाळी आवर्तन मिळणार किंवा नाही पुढील परिस्थितीवर अवलंबून असणार आहे. उन्हाळी आवर्तनाचे गाजर दाखवू नका. ठरल्याप्रमाणे रब्बीचे दोन आवर्तन शेतक-यांना पूर्ण क्षमतेने द्या. सिंचनापासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये अन्यथा शेतक-यांसोबत आपण रस्त्यावर उतरू असा ईशारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिला आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतक-यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी बांधण्यात आलेल्या मंजूर गट ऑफिस या नूतन इमारतीचे उदघाटन नुकतेच चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले. तत्पूर्वी कारखान्याचे संचालक अशोकराव तीरसे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. चंद्रकलाताई तीरसे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी पुढे बोलतांना आशुतोष काळे म्हणाले की, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची मुळीच इच्छा नसतांना एवढ्या मोठ्या दुष्काळाचे संकटातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी व के. टी. वेअर्स बंधा-यावर अवलंबून असणा-या शेतक-यांवर झालेल्या अन्यायाला कुठे तरी वाचा फोडली जावी यासाठी मी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला उपस्थित राहिलो. या बैठकीत मी दारणा धरणातून गोदावरी नदीपात्रात जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले त्यामुळे के. टी. वेअर्स बंधा-यावर अवलंबून असणा-या शेतक-यांचा, जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गोदावरी कालव्याच्या आवर्तनाबरोबरच के. टी. वेअर्स बंधारे भरून देण्यासाठी नियोजन करून पुन्हा गोदावरी नदीपात्रात पाणी सोडून बंधारे भरून द्यावे अशी विनंती केली जेणेकरून अतिशय दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना दिलासा मिळेल परंतु बैठकीला हजर असलेल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी माझ्या मागणीला दुजोरा दिला नाही त्यामुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मी एकटा पडल्यामुळे माझ्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची खंत व्यक्त करीत कालवा सल्लागार समितीची बैठक फक्त देखावा असल्याचे आशुतोष काळे म्हणाले. मागील चार वर्षात शेतक-यांच्या बाबतीत शासनाने जे चुकीचे निर्णय घेतले गेले त्या शासनाच्या निर्णयाला तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी कुठेही विरोध दर्शविला नाही त्यामुळे शेतक-यांना बुरे दिन आले आहे. परंतु यापुढे अतिशय अडचणीत सापडलेल्या शेतक-यांसाठी नेहमीप्रमाणे शासनाविरुद्ध संघर्ष करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, संचालक ज्ञानदेव मांजरे, मीननाथ बारगळ, सर्जेराव कोकाटे, सचिन चांदगुडे, सचिन रोहमारे, आनंदराव चव्हाण, सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, काकासाहेब जावळे, बाळासाहेब बारहाते, विठ्ठलराव आसने, अशोकमामा काळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष माधवराव खिलारी, मंजुरचे सरपंच विठ्ठलराव जामदार, सोमनाथ चांदगुडे, गौतम बकेचे संचालक पुंडलिक माळी,राहुल जगधने, तसेच कारखान्याचे सेक्रेटरी सुनील कोल्हे,ऑफिस सुपरिटेंडेंट बाबा सय्यद शेतकी खात्यांचे प्रमुख पदाधिकारी सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सेक्रेटरी सुनील कोल्हे यांनी केले तर आभार कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram