सात नंबर अर्ज केलेल्या सर्वच शेतक-यांना पाणी मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - आशुतोष काळे

गोदावरी कालव्याचे आवर्तन मिळावे यासाठी शेतक-यांनी पाटबंधारे विभागाकडे रीतसर सात नंबर अर्ज भरून दिले आहेत. परंतु पाटबंधारे विभागाचे अधिका-यांनी अडीच किलोमीटर पर्यतच शेतीला पाणी देणार असा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. त्याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांना समक्ष भेटून अडीच किलोमीटर पर्यंत पाणी देण्याची अट रद्द करावी अन्यथा आपण राहाता उपविभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन करू असे निवेदन दिले होते परंतु पाटबंधारे विभागाने शेतक-यांच्या बाबतीत कोणताच सकारात्मक निर्णयण घेतल्यामुळे आपण सांगीतल्याप्रमाणे ठिय्या आंदोलन करीत असून जोपर्यंत सात नंबर अर्ज केलेल्या सर्वच शेतक-यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नसणार नाही असा सज्जड इशारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी दिला आहे. आशुतोष काळे यांच्या आवाहनाला पाठींबा देत रामपूरवाडीच्या शेतक-यांनी दोन दिवसापासून पाटबंधारे कार्यालयात आमरण उपोषण सुरु केले आहे. आशुतोष काळे ठीय्या आंदोलन करण्यासाठी आंदोलन स्थळी पोहोचण्यापूर्वीच उपविभागीय अभियंता कासम गोटमवार नासिक येथे वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी रवाना झाले होते. पाटबंधारे विभागाने शेतक-यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय न घेतल्यामुळे आशुतोष काळे यांनी शब्द दिल्याप्रमाणे शेतक-यांसमवेत पाटबंधारे विभागाच्या राहाता उविभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. उपविभागीय अभियंता कासम गोटमवार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून आशुतोष काळे यांनी संपर्क करून आंदोलनाच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. शेतक-यांचा खरीप हंगाम वाया गेलेला असून सर्व शेतकरी रब्बी हंगामाच्या आशेवर आहेत. जर शेतक-यांना शेतीसाठी पाणी मिळाले नाही तर परिस्थिती चिघळू शकते याचे भान पाटबंधारे विभागाने ठेवून तातडीने अडीच किलोमीटरची अट रद्द करून सर्व शेतक-यांना शेतीसाठी पाणी द्यावे असा आग्रह धरला. शेतीला पाणी मिळावे यासाठी बेमुदत आमरण उपोषणाला बसलेल्या रामपूर वाडीच्या शेतक-यांच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर करून आपण शेतक-यांसोबत असल्याचे सांगितले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram