दुष्काळग्रस्त दहेगाव मंडलाच्या गावातील विद्यार्थ्यांना मोफत एस. टी. पास तातडीने द्या – आशुतोष काळे

राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली असून कोपरगाव तालुक्यात सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती असतांना तालुक्यातील फक्त दहेगाव महसूल मंडलात दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र या महसूल मंडलातील गावांना शासनाच्या वतीने देण्यात येणा-या विविध योजनांचा लाभ आजपर्यंत मिळू शकला नाही. या उपाय योजनांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणारे मोफत एस. टी. पास आजपर्यंत देण्यात आलेले नाही. हे मोफत एस. टी. पास या दुष्काळग्रस्त दहेगाव मंडलाच्या दहेगाव बोलका, भोजडे, लौकी, पढेगाव, कासली, शिरसगाव, सावळगाव, तीळवणी, उक्कडगाव, गोधेगाव, घोयेगाव, आपेगाव, वारी, कान्हेगाव, सडे, धोत्रे, खोपडी, तळेगाव-मळे या गावातील विद्यार्थ्यांना तातडीने वितरीत करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे महाव्यवस्थापक माधवराव काळे यांना पाठवविलेल्या पत्रात केली आहे. दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे सर्वत्रच दुष्काळी परिस्थिती आहे. तालुक्याच्या काही भागात ऐन हिवाळ्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्याचे प्रस्ताव दाखल होत असतांना शासनाला कोपरगाव तालुक्यात फक्त दहेगाव मंडलामध्येच दुष्काळ दिसत असला तरी या मंडलाच्या गावातील नागरिकांपर्यंत शासनाच्या वतीने देण्यात येणा-या कोणत्याच योजना अद्याप पोहोचलेल्या नाही. शासनाच्या वतीने सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाचे चालू बिलामध्ये ३३.०५ टक्के सुट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी व परिवहन मंत्र्यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षासाठी एस. टी. पास मोफत देण्याची घोषणा केलेली आहे परंतु आजपर्यंत कोणत्याही गावाला या योजनांचा लाभ मिळालेला नाही. दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शहराच्या ठिकाणी बसने जावे लागते. परंतु आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थी बसचा पास घेवू शकत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी या दुष्काळग्रस्त दहेगाव मंडलाच्या गावातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मोफत एस. टी. पास वितरीत करण्याच्या सुचना प्रशासनाने कोपरगाव बस आगार प्रमुखांना द्याव्या अशी मागणी आशुतोष काळे यांनी दिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram