महात्मा ज्योतिबा फुलेंनी देशाच्या शिक्षणव्यवस्थेतील अज्ञान दूर केले - मा.आ. अशोकराव काळे

अन्याय, अत्याचार व गुलामगिरीतून समाजाची मुक्तता करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना करुन आपले संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी वेचणारे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील अज्ञान दूर केले असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अशोकराव काळे यांनी केले. कोपरगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची १२८ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार अशोकराव काळे यानी महात्मा फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून महात्मा फुलेंनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. इ.सन १८४८ साली पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढून महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यांच्या विचाराची आजही समाजाला मोठी गरज असल्याचे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. यावेळी विजयराव आढाव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, सचिन गवारे, संतोष शेजवळ, नितीन त्रिभुवन, सतिश शिंदे, निलेश उदावंत, रघुनाथ मोरे, ठकाजी लासुरे, शंकर घोडेराव, बाळासाहेब पवार, रविंद्र देवरे, किरण आढाव, नारायण लांडगे, राजेंद्र रोकडे, आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram