कोपरगावमध्ये राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा आशुतोष काळेंच्या हस्ते शुभारंभ

आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर मैदानी खेळाशिवाय पर्याय नाही. तंत्रज्ञानाच्या युगात या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्याचा बौद्धिक क्षमतेवही परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर करून मैदानावर येवून मैदानी खेळ खेळा त्यामुळे तुम्हाला नेहमी प्रसन्न व प्रफुल्लीत वाटेल व बौद्धिक क्षमताही वाढेल. आजची तरुणाई हे या आपल्या देशाचे उद्याचे भविष्य आहे. आणि आपल्या देशाचे भविष्य हे बौद्धिक व शारीरिक दृष्ट्‍या कणखर असलेच पाहिजे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात मैदानी खेळाकडे कधीही दुर्लक्ष होऊ देवू नका असा संदेश कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी केले. माजी आमदार के. बी. रोहमारे यांचे स्मरणार्थ कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन कोपरगाव व के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव यांचे संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उदघाटन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांचे शुभहस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मिलींद कुलकर्णी, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव अॅड. संजीव कुलकर्णी, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, कर्मवीर काळे कारखान्याचे व्हा.चेअरमन सुनिल शिंदे, सुनिल बोरा, अशोक खांबेकर,. सुधीर डागा, पिपल्स बँकेचे चेअरमन डॉ. विजय कोठारी, बाबा खुबाणी, संजय भनसाळी,. दिपक विसपुते, सोमैया केमिकल्स साकरवाडीचे. एस. मोहन, सत्येन मुंदडा, राजेश ठोळे, राहुल रोहमारे, कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष संदीप रोहमारे,डॉ. जपे, व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. ही स्पर्धा ८ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०१८ या कालावधीत १९ वर्षाआतील एकेरी पुरूष/महिला विजेत्या स्पर्धकांना रू. ३,०००/-,२०००/-,१०००/-, खुला दुहेरी पुरूष –विजेत्या स्पर्धकांना रू. ७,०००/-,५,०००/-,२,०००/-,खुला दुहेरी महिला विजेत्या स्पर्धकांना रू. २१०००/-,११०००-,/५०००/- तसेच ३५ वर्षावरील दुहेरी पुरूष गटातील विजेत्या स्पर्धकांना रू. १५,०००/-, ७,०००/-,३,०००/- बक्षिसे देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकूण १६५ संघ सहभागी झाले आहेत. हे स्पर्धेचे दुसरेच वर्ष असून स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram