पूर्व भागातील शेतक-यांची मागणी पूर्ण, आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून शिरसगावला उपबाजार समिती सुरु

मागील काही वर्षापासून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतक-यांनी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागात सुरु करावी अशी आग्रही मागणी होती. शेतक-यांचे होत असलेली ससेहोलपट पाहून शेतक-यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी उपबाजार समिती सुरु करण्यासाठी वेळोवेळी व्यापारी वर्गाच्या बैठका घेतल्या. उपबाजार समिती सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापति व संचालक मंडळाला उपबाजारसमिती सुरु करण्याच्या सुचना दिल्या होत्या. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती नुकतीच शिरसगाव येथे ह.भ.प.दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते सुरु करण्यात आली. या उपबाजार समितीमध्ये पहिल्याच दिवशी शेतक-यांनी आपला शेतमाल मोठ्या प्रमाणात विक्रीला आणून मोठा प्रतिसाद दिला. उपबाजार समिती सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी जवळपास १००० क्विंटल मका शेतक-यांनी विक्रीसाठी आणली होती. मकाला सरासरी १६६० रुपये कमीत कमी १६१५ व जास्तीत जास्त १७०५ एवढा दर मिळाला. तर हरबरा पिकाला ३५४१ किमान दर मिळाला. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या प्रमाणे आडत्या पद्धत बंद करून नंबरप्रमाणे शेतक-यांनी आणलेल्या शेतमालाचे वाहने उभी करून कर्मचारी बोली लावतात व खरेदीदार शेतक-यांना तीच पद्धत उपबाजार समितीमध्ये राबविण्यात आली. शेतक-यांच्या प्रत्येक मालाची एकाच वेळी अनेक खरेदीदारांनी बोली लावल्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन शेतक-यांच्या मालाला उच्चांकी दर मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती शिरसगाव येथे सुरु झाल्यामुळे शेतक-यांच्या शेतमाल विक्रीची अडचण दूर झाली असून त्याचबरोबर शेतक-यांचा वाहतूक खर्च व वेळही वाचणार आहे. उपबाजार समिती सुरु करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतक-यांनी युवा नेते आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. उपबाजार समितीच्या शुभारंभ प्रसंगी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले, माजी उपसभापती पंचायत समितीचे सदस्य मधुकर टेके, संचालक दादा टूपके, भाऊसाहेब शेळके, सुदाम भाटे, अजित लोहाडे, तेजमल धाडीवाल, माधवराव रांधवणे, माजी उपसभापति सयराम कोळसे, माजी संचालक अंबादास पाटोळे सचिव पी.बी. सिनगर, सरपंच सुनील उकिरडे, उपसरपंच रिजवाना पटेल, ग्रामसेविका नसीम सय्यद आदी मान्यवरांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतक-यांनी आपला शेतीमाल शिरसगाव उपबाजारसमितीमध्ये बुधवार व रविवार सोडून सत्र सर्व दिवशी सकाळी ११.०० वाजता लिलाव सुरु होण्यापूर्वी विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले यांनी उपस्थित शेतक-यांना केले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram