वक्तृत्व ही केवळ शब्दांची आतषबाजी नसून जीवनाची उपासना - सौ.पुष्पाताई काळे

विषय आणि विचार लोकांच्या मनापर्यंत पोहोचविण्याचे वक्तृत्व उत्तम माध्यम आहे. चिंतनामुळे वक्तृत्व तेजस्वी होते. श्रवण आणि वाचन, मनन आणि चिंतन यांना एकांताचे कोंदण लाभले तर वक्त्याचे वक्तृत्व झळाळून निघते. वक्तृत्व कला तुम्हाला पुढील आयुष्यात शिदोरी म्हणून उपयोगी पडेल. वक्तृत्व ही उपासना असून निष्ठापूर्वक उपासना करणाऱ्यांनाच वाग्देवता प्रसन्न होते. वक्तृत्व ही केवळ शब्दांची आतषबाजी नसून जीवनाची उपासना आहे असे प्रतिपादन प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा व स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांनी केले. सालाबाद प्रमाणे याहीवर्षी स्व.सौ.सुशीलामाई काळे यांच्या स्मरणार्थ राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व कला,विज्ञान कनिष्ट महाविद्यालय गौतमनगर-सुरेगाव येथे भव्य राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचे उदघाटन सौ.पुष्पाताई काळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन करतांना आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या. सदरची स्पर्धा ७ वी ते ८ वी (लहान गट) ९ वी ते १० वी (मध्यम गट) आणि ११ वी ते १२ (मोठा गट) अशा तीन गटात घेतली गेली जाणार आहे. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येणार असून त्या बरोबर सांघिक पारितोषिके व फिरता करंडक व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी लहान गट – मोबाईल शाप की वरदान, स्त्री भ्रूण हत्या एक सामाजिक कलंक, त्यागमूर्ती रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे योगदान, मध्यम गट – प्रदूषण एक जागतिक समस्या, स्वच्छ भारत अभियान, कै. सौ. सुशीलामाई ऊर्फ माईसाहेब काळे यांचे सामाजिक व शैक्षणिक योगदान, तसेच मोठ्या गटासाठी दुष्काळाला सामोरे जातांना, विद्यार्थी व आजची बदलती शिक्षण पद्धती, भारतीय संविधान – एक श्रेष्ठ ग्रंथ आदी विषय ठेवण्यात आले होते. स्पर्धेत अहमदनगर,नाशिक ,औरंगाबाद या जिल्ह्यातील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, शिवाजी वाबळे, जनार्दन कोळपे, रामनाथ काळे, गोविंद खोत, छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे आदी मान्यवर उपस्थितीत होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक व पाहुण्यांचे स्वागत प्राचार्या श्रीमती काकडे सी. आर. यांनी केले,पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक मोरे आर.एस. यांनी केला,सूत्रसंचालन अरुण रुपवते यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक गोडे एम. के. यांनी मानले.यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका,विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram