जीवनात खेळाचे महत्व अनन्यसाधारण – आशुतोष काळे

बदलत्या जीवनशैलीमुळे शारीरिक कष्ट अतिशय कमी झाले आहे. सध्याचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे युग असून या युगात आपल्या देशाला प्रगतीपथावर घेवून जाण्यासाठी शारीरिक ब मानसिक दृष्ट्‍या सक्षम नागरिक तयार झाले पाहिजे. मनुष्य बुद्धिवान प्राणी असून मनुष्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर आकाशाला गवसणी घातली आहे. मात्र हे सर्व साध्य करीत असतांना शारीरिक कष्ट माणूस विसरला आहे. ते आरोग्यासाठी अतिशय घातक असून त्यामुळे आज प्रत्येक वयोगटातील व्यक्ति ताणतणावाखाली दिसतो. त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होऊन वेळप्रसंगी विविध आजारांना बळी पडावे लागत आहे. हे सर्व टाळण्यासाठी मैदानी खेळाशिवाय पर्याय नाही. मैदानी खेळामुळे शारीरिक क्षमतेबरोबर व्यक्तीतील खिलाडु वृत्ती, एकाग्रता, सहनशीलता, आत्मविश्वास,नेतृत्व गुण आदी महत्वाच्या गुणांचा विकास होतो. त्याचा फायदा त्या व्यक्तीबरोबरच देशाच्या विकासासाठीही होतो. त्यामुळे जीवनात खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुट मध्ये सालाबादप्रमाणे याहीवर्षी हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य सुभाष भारती, गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थिनींनी युवा नेते आशुतोष काळे यांच्या सोबत सेल्फी घेवून आपला आनंद द्विगुणीत केला.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram