व्यावसायिक कौशल्य वृद्धिंगत होण्यासाठी बाल आनंद मेळावे उत्तम माध्यम – आशुतोष काळे

निरागस चिमुकले ज्ञानाचा श्रीगणेशा गिरवीत असतांना त्यांना शिक्षणा बरोबरच व्यावहारिक ज्ञानाची माहिती व्हावी यासाठी आयोजित करण्यात आलेले बाल आनंद मेळावे चिमुकल्यांचे व्यवासायिक कौशल्य वृद्धिंगत होण्यासाठी अतिशय उत्तम माध्यम असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील कारवाडी, धामोरी येथे आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे उपस्थित होते. आशुतोष काळे पुढे म्हणाले की,आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक व या देशाची भावी पिढी आहे. या भावी पिढीला विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण देणे काळाची गरज आहे. व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव अगदी लहान वयात आल्यामुळे श्रमाचे मोल काय असते याची जाणीव होत असल्यामुळे बाल आनंद मेळावे अतिशय स्तुत्य उप्रकम असल्याचे सांगत बाल आनंद मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी बाल आनंद मेळाव्यामध्ये चिमुकल्यांच्या स्टॉलची पाहणी करून माहिती जाणून घेत आशुतोष काळे यांनी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात फळे, भाजीपाला ,चविष्ट, चटकदार खाद्यपदार्थ तयार करून विक्रीसाठी आणले होते. अतिशय सुबक पद्धतीने स्टॉलची मांडणी केली होती. विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला. यावेळी सभापती सौ. अनुसया होन, जिल्हा परिषद सदस्या सौ. विमल आगवण, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक ज्ञानदेव मांजरे, कारभारी आगवण, नारायण मांजरे, माधवराव खिलारी, पंचायत समिती सदस्या सौ. पोर्णिमा जगधने, पुंडलिक माळी, सुदाम गाडे, धामोरीचे सरपंच नारायण भाकरे, गटविकास अधिकारी कापिलनाथ कलोडे, रोहिदास होन, सुभाष आहिरे, अशोक म्हस्के, अॅड. गणेश भाकरे, विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, सुरेगाव गटाचे सर्व ग्रामसेवक, आदी मान्यवरांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram