इंटर हाऊसेस स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव – मा.आ.अशोकरावजी काळे.

स्पर्धेच्या युगात अभ्यास अतिशय महत्वाचा आहे परंतु विद्यार्थी जीवनात अभ्यासाबरोबरच खेळालाही महत्व आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकास साधायचा असेल तर खेळाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. खेळातील शारीरिक हालचाली मनावरील ताणतणाव कमी करतात मन आनंदी व प्रसन्न राहते. खेळामुळे शालेय जीवनात शिस्त, जिद्द हे गुण वाढीस लागून या स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळून त्यांचा सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे यांनी केले. एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे व संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या इंटर हाऊसेस स्पर्धेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेत शाळेतील तब्बल ८०० विद्यार्थी एकूण ६ हाऊसेस मध्ये विभाजित करण्यात आले. या मध्ये मुलांच्या रेड हाऊसचे नेतृत्व सुभाष वाणी, ऑरेंज हाऊसचे नेतृत्व प्रकाश भुजबळ, यलो हाऊसचे नेतृत्व उत्तम सोनवणे तर ब्ल्यू हाऊसचे नेतृत्व प्रणव नेगी यांनी केले. तर मुलींच्या रोझ हाऊसचे नेतृत्व सौ. सुनिता कुलकर्णी तसेच लीली हाऊसचे नेतृत्व सौ. कविता चव्हाण यांनी केले. स्पर्धांचा प्रारंभ क्रिकेट या खेळाने होवून उद्घाटन नॉलेज आवर्सचे चीफ एडीटर संजय गंगावने यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बेसबॉल, सॉफटबॉल इ. खेळांच्या स्पर्धा १४ व १७ वर्ष वयोगटात खेळविण्यात आल्या. तसेच चित्रकला व वकृत्व स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांचा समारोप संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकरावजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बास्केटबॉल या खेळाने करण्यात आला. स्पर्धांच्या यशस्वी आयोजना बद्दल त्यांनी शाळेचे प्राचार्य नूर शेख , क्रीडा संचालक सुधाकर निलक, रमेश पटारे, संजय इटकर, राजदीप यादव, रीजवान पठाण व कन्हैया गंगुले तसेच सर्व हाऊस मास्टर्स व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन केले. स्पर्धांच्या निकालातुन कॉक हाऊस म्हणून विजेत्या ठरलेल्या मुलांच्या व मुलींच्या हाऊसची घोषणा दि. ५ जानेवारी २०१९ रोजी स्व. सौ. सुशिलामाई काळे यांच्या २० व्या स्मृती दिनानिमीत्त आयोजीत स्पर्धांच्या उद्घाटना प्रसंगी संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहीती प्राचार्य नूर शेख यांनी दिली.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram