तरुणाईने मोबाईलचा मर्यादित वापर करून मैदानी खेळाकडे लक्ष केंद्रित करा –आशुतोष काळे

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. मोबाईल ही काळाची गरज आहे. परंतु या मोबाईलमुळे संवाद कुठतरी हरवत चाललेला आहे सोशल मिडीयाचा अतिरेक वाढल्यामुळे युवा वर्ग अहोरात्र मोबाईलमध्ये गुंतलेला दिसत आहे त्यामुळे भविष्यात मैदानी खेळ लुप्त होतील की काय अशी भिती वाटू लागली आहे. आजच्या तरुणांनी नवीन तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर करून मैदानी खेळाकडे लक्ष केंद्रित करावे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कोपरगाव व दादा पोटे इलेवन क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने के.बी.पी. विद्यालयाच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेतील पहिल्या बक्षिसाचा मानकरी स्पेस इलेवन क्रिकेट क्लब कोपरगाव ठरला असून विजेत्या संघास कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते रोख रुपये ३१,१११ /- व साईबाबा चषक प्रदान करण्यात आला. यावेळी समता नागरी पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष्य सुनील गंगुले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनिल शिलेदार, हिरामण गंगुले, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, राजाभाऊ जोशी, राहुल शिरसाठ, संतोष मुळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धतील दुसरे २१,१११/- चे बक्षीस स्मार्ट किचन क्रिकेट क्लब कोपरगाव, तिसरे ११,१११/- चे बक्षीस पाथर्डी क्रिकेट क्लब पाथर्डी तर चौथे ७,७७७/- चे बक्षीस डॉल्फिन क्रिकेट क्लब वैजापूर या संघाने पटकावले आहे. मालिका वीर म्हणून राहुल गडकरी, बेस्ट संघ दादा पोटे इलेवन क्लब, बेस्ट बॅटसमन सुनील मुळेकर तर आकाश आहेर बेस्ट बॉलर ठरला आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दादा पोटे, डॉ.असिफ शेख, सुनील मुळेकर, शरद थोरात, आकाश आहेर, बंटी थोरात, अनिल लोणारी, अमोल परजणे, किशोर पंडोरे, सागर पंडोरे, शुभम औताडे, गणेश बारसे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram