जिल्हा परिषद समितीच्या सत्तांतरानंतर घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे शिक्षणाच्या बाबतीत कोपरगाव तालुका आघाडीवर- आशुतोष काळे.

जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेसच्या उमेदवारांना निवडून देवून सत्ता परिवर्तन झाले. जिल्हा परिषद समितीच्या सत्तांतरानंतर घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे शिक्षणाच्या बाबतीत कोपरगाव तालुका आघाडीवर आला असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे केले. जिल्हा परिषद चांदेकसारे गटाच्या सर्व शाळांच्या बाल आनंद मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी पोहेगाव येथे ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सौ.सोनाली रोहमारे होत्या. यावेळी पुढे बोलतांना आशुतोष काळे म्हणाले की, सत्ता परिवर्तनाचा अचूक परिणाम होऊन शिक्षण विभागाच्या कार्याला प्रचंड वेग आला आहे. पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य शालेय अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असल्यामुळे आज कोपरगाव तालुक्यात विविध ठिकाणी शाळा खोल्यांचे बांधकाम सुरु आहे. भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळांच्या मागील काही वर्षांपासून असलेल्या उणिवा दूर करणार आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कामाला लागावे व सातत्य ठेवावे. त्यातून विद्यार्थ्यांचे खरे भवितव्य घडणार असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल्सवर खाद्यपदार्थ भाजीपाला, शालेय साहित्य, फळे आदींची सुबक मांडणी केली होती. युवा नेते आशुतोष काळे यांनी सर्व स्टॉल्सवर जावून विद्यार्थ्यांशी हितगुज केले. याप्रसंगी जी.प.सदस्य राजेश परजणे, जी.प.सदस्या सौ.सोनाली रोहमारे, पंचायत समिती सभापती सौ.अनुसया होन, उपसभापती श्री.अनिल कदम, सदस्य अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुनील शिंदे, संचालक सचिन रोहमारे, गट विकास अधिकारी कापिलनाथ कलोडे, उत्तमराव औताडे, उत्तमराव कुऱ्हाडे, अॅड.राहुल रोहमारे, रोहिदास होन, एम.टी.रोहमारे, योगेश औताडे, नंदकिशोर औताडे, निवृत्ती शिंदे, चंद्रकांत औताडे, मधुकर औताडे, सचिन मुजगुले, राजेंद्र औताडे, लक्ष्मण थोरात, जवळके सरपंच बाबुराव थोरात, देर्डे सरपंच योगीराज देशमुख, मढी सरपंच सौ. वैशाली आभाळे, के.डी. खालकर,बाळासाहेब औताडे, जीजाबापू गव्हाणे, संतोष वाके, शेख शबाना गट अधिकारी, ढेपले सर, केंद्रप्रमुख, वसंत शिंदे, कमलाकर शिंदे, जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक, पालक, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram