गोदाकाठ महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! खाऊगल्लीला आले यात्रेचे स्वरूप,आदर्श शेतकरी व आदर्श गोपालक यांचा गौरव

प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्ट (प्रदर्शन) कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या गोदाकाठ महोत्सवाला कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून महिला बचत गटांना चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळाल्याचे गोदाकाठ महोत्सवात सहभागी झालेल्या बचत गटाच्या महिलांनी सांगितले आहे. शुक्रवार दिनांक ४-१-२०१९ पासून सुरु झालेल्या या गोदाकाठ महोत्सवाला महिला बचतगटांच्या महिलांनी विविध प्रकारच्या तयार मालांचे एकून १५० स्टॅाल्स लावले आहे. या गोदाकाठ महोत्सवाच्या आयोजक प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी महिला बचत गटांच्या महिलांना अतिशय अल्प दरात ना नफा ना तोटा या धर्तीवर स्टॅाल्स उपलब्ध करून दिले आहेत. मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही महिला बचत गटांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाची खरेदी करण्यासाठी नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे खाऊ गल्लीला जणू काही यात्रेचे स्वरूप आले होते. एकूणच दैनदिन धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात गोदाकाठ, महोत्सव कोपरगाव तालुक्याच्या नागरिकांच्या पसंतीला उतरला आहे. महोत्सवाच्या दुस-या दिवशी आपल्या देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा कलर्स ऑफ इंडिया या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद सेस फंड २०१८ चे अंतर्गत प्रगतीशील पुरस्कार प्राप्त शेतकरी दिलीप शिंदे-जेवूर कुंभारी, सोपानराव आभाळे-मढी खुर्द, प्रदीप पगार-धामोरी, संतोष पिंपरीकर-ब्राम्हणगाव, कुंडलिक थोरात-कुंभारी, गणेश घाटे-धोत्रे, तसेच आदर्श गोपालक राजेंद्र तनपुरे-कारवाडी, अजित रक्ताटे-कोकमठाण, केशव दहे-डाऊच, जयवंतराव होन-चांदेकसारे यांचा युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून आयोजकांचा कोपरगाव तालुक्यातील महिला बचत गटांना आर्थिक संजीवनी देण्याचा उद्देश सफल झाला असून महिला बचत गटांचा आणि महिलांचा ख-या अर्थाने उत्कर्ष होऊन महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व सबला व्हाव्या ही आयोजकांची संकल्पना सत्यात उतरल्याचे चित्र गोदाकाठ महोत्सवाला नागरिकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादावरून दिसून येत आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram