गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना माईंनी आईची माया दिली - सौ चैतालीताई काळे

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशनन सोसायटी संचलीत गौतम पब्लिक स्कूल मध्ये स्व. सौ. सुशिलामाई काळे यांच्या २० व्या पुण्यतिथी निमीत्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या सचिव व अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते करण्यात आहे. स्पर्धेत एकूण १७ शाळेतील ७२५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांनी माईंच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की माईंनी साहेबांना आयुष्यभर साथ देत संस्थेच्या भरभराटीसाठी आपले अमूल्य योगदान दिले. गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना माईंनी आईची माया दिली. माई आणि साहेबांचे हे कार्य खूप मोठे असून ते अविरत चालू ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहू अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्ती केली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे व स्व. सौ. सुशिलामाई काळे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या प्रसंगाचे औचित्य साधून शाळेत २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या इंटर हाऊसेस स्पर्धांचे बक्षीस वितरण सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर इंटर हाऊसेस स्पर्धा शाळेतील मुलांच्या रेड हाऊस, ऑरेंज हाऊस, येलो हाऊस, ब्ल्यू हाऊस व मुलींच्या रोझ हाऊस व लीली हाऊस अंतर्गत घेण्यात आल्या. या अंतर्गत फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बेसबॉल, सॉफ्टबॉल, बास्केटबॉल, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये मुलांच्या येलो हाऊसने बाजी मारत कॉक हाऊस कप पटकावला. येलो हाऊसचे नेतृत्व उत्तम सोनवणे यांनी केले. तर मुलींच्या लीली हाऊसने कॉक हाऊस कप पटकावला या हाऊसचे नेतृत्व सौ. कविता चव्हाण यांनी केले. स्पर्धांचे यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका, क्रिडा संचालक, शिस्त विभाग प्रमुख, कला शिक्षक व सर्व हाऊस मास्टर्स व त्यांचे सहकारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन शाळेचे कला शिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन सौ.रेखा जाधव यांनी केले तसेच कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेशा प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कला शिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांनी आखून त्यास मुर्त स्वरूप दिले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram