गोदाकाठ महोत्सवातुन बचत गटाच्या महिलांच्या स्वप्नांना उंच भरारी - सौ. राजश्रीताई घुले

महिला बचत गटामुळे समाजातील स्त्रियांना आत्मसन्मान मिळाला आहे. महिला बचत गट ही केवळ कागदावरील शासकीय योजना नाही. महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची एक सुप्त क्रांतिकारी चळवळ असून आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून बचत गटाच्या महिलांच्या स्वप्नांना उंच भरारी देण्याचे काम गोदाकाठ महोत्सवातून होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले यांनी केले. प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्ट (प्रदर्शन) कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या गोदाकाठ महोत्सवाला अहमदनगर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले यांनी भेट दिली याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना त्या बोलत होत्या. यावेळी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात सत्कार आला.याप्रसंगी युवा नेते आशुतोष काळे, सौ.चैतालीताई काळे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ. शारदाताई लगड, सौ. निर्मला मालपाणी, जिल्हा परिषद सदस्या सौ.सुप्रियाताई झावरे, प्रदेश सरचिटणीस सौ. मेघाताई कांबळे, सौ. राजश्रीताई मांढरे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. राजश्रीताई रसाळ आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या. पुढे बोलतांना सौ. राजश्रीताई घुले म्हणाल्या की, ग्रामीण भागांतील महिलांमध्ये आत्मविश्‍वास आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी गोदाकाठ महोत्सव महत्वाची भूमिका बजावणार आहे. चूल आणि मूल या जबाबदारी सोबतच त्यापलीकडचे जीवन जगण्याची प्रेरणा गोदाकाठ महोत्सवातून बचत गटाच्या महिलांना मिळत आहे. त्यामुळे महिला खऱ्या अर्थाने सक्षम होत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून आपला व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांमध्ये उद्योजक होण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम गोदाकाठ महोत्सव करीत असून गोदाकाठ महोत्सव महिला सबलीकरणासाठी वरदान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कोपरगाव तालुक्यातील आजी माजी महिला जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्या, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्या, नगरसेविका, सरपंच तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी महिलांचा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच कोपरगाव शहर व तालुक्यातील विविध शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आपले विविध कलागुण व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी युवानेते आशुतोष काळे व सौ. चैतालीताई काळे यांनी सर्व स्टॉल्सवर जाऊन सर्व बचत गटाच्या महिलांशी तसेच महोत्सवात येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने गोदाकाठ महोत्सवात गर्दीचा उच्चांक झाला.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram