काळे परिवाराचा सामाजिक वारसा सौ. पुष्पाताई पुढे चालवीत आहे – जेष्ठ गीतकार प्रवीण दवणे

महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे मोठे संघटन सौ. पुष्पाताई काळे यांनी उभे केले आहे. गोरगरीब महिलांच्या कुटुंबाला आर्थिक बळ देण्यासाठी त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळवून दिले आहे. बचत गटातील महिलांच्या तयार मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी 'गोदाकाठ' महोत्सवाच्या माध्यमातून व्यावसायिक संधी उपलब्ध करून दिली आहे. महिलांसाठी त्या करीत असलेले समाजकार्य अजोड असून काळे परिवाराचा सामाजिक वारसा सौ. पुष्पाताई काळे समर्थपणे पुढे चालवीत असल्याचे प्रतिपादन जेष्ठ कवी,लेखक प्रवीण दवणे यांनी केले. सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान व जिजाऊ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा सावित्रीबाई फुले जीवनगौरव पुरस्कार प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती राजश्रीताई ससाणे यांना आमदार पांडुरंग अभंग यांच्या शुभहस्ते कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ कवी,लेखक प्रवीण दवणे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक बाजीराव तिडके होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram