गौतम पॉलिटेक्निकच्या कॅरम संघाला उपविजेतेपद

इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने अहमदनगर येथील पाऊलबुद्धे फार्मसी महाविद्यालयात विभागीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व पॉलिटेक्निक व फार्मसी कॉलेजच्या संघांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेतील अंतिम सामना अमृतवाहिनी पॉलिटेक्निक संगमनेर व गौतम पॉलिटेक्निक कोळपेवाडी या संघांमध्ये झाला.स्पर्धेत सुरुवातीपासून अतिशय चांगल्या खेळाचे प्रदर्शन घडविणा-या गौतमच्या संघाला अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात अपेक्षित यश मिळाले नाही त्यामुळे त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.सदर विजयी संघातील खेळाडू शेख फैजल, गोसावी सोम, सय्यद आदिल, नरोडे सार्थक यांचा कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांनी सत्कार केला.याप्रसंगी प्राचार्य सुभाष भारती, प्रा. अमोल गोंदकर, अण्णासाहेब बडे आदी उपस्थित होते.विजयी संघाचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे, व्हाईस चेअरमन छबुराव आव्हाड, संस्थेचे विश्वस्त युवा नेते आशुतोष काळे ,सहसचिव सौ.स्नेहलताई शिंदे, संस्थेचे सर्व सदस्य यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram