राजमाता जिजाऊंची प्रेरणा राष्ट्राची कणखर पिढी घडविण्यासाठी आवश्यक – सौ. चैतालीताई काळे

हिंदवी स्वराज्याचे जनआंदोलन ऊभारणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे जीवनचरित्र समस्त महिला वर्गाला प्रेरणादायक आहे. राजमाता जिजाऊ संकटसमयी कधीही हताश किंवा निराश झाल्या नाहीत. त्यांनी शिवाजी महाराजांवर अतिशय चांगले संस्कार केले. समाजात एकोपा निर्माण करून प्रतिकुल परिस्थितीवर मात करत रयतेचे स्वराज्य निर्माण केले. राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा आदर्श घेवून प्रत्येकाने आपल्या आईचा आदर केला पाहिजे. आजदेखील शिवरायांसारखे पराक्रमी, मानवतावादी नेतृत्व उदयाला येवू शकते पण त्यासाठी प्रत्येक घरात जिजाऊ निर्माण झाली पाहिजे. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले. धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्वास व प्रचंड इच्छाशक्तीने ओतप्रोत भरलेले राजमाता जिजाऊंचे व्यक्तिमत्व होते. असे थोर व्यक्तिमत्व असलेल्या राजमाता जीजाऊंची प्रेरणा राष्ट्राची कणखर पिढी घडविण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी कोपरगाव येथे केले. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ उद्यानात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी नगरसेविका राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्षा स्वप्नजा वाबळे, उपाध्यक्षा शीतल लोंढे, नगरसेविका प्रतिभाताई शिलेदार, वर्षाताई गंगुले, माधवी वाकचौरे, मायावती खरे, कल्पना मेढे, रुपाली भोकरे, अश्विनी आढाव, शीतल लोंढे, प्रगती वढणे, नेवसे ताई,वैशाली भगत, भाग्यश्री बोरुडे, ऐश्वर्या वढणे, पूजा आहिरे, संगीता आहिरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, संतोष चवंडके, रमेश गवळी,डॉ.चन्द्रशेखर आव्हाड, कृष्णा आढाव, नगरसेवक विरेन बोरावके,मंदार पहाडे, हिरामण गंगुले, सुनिल शिलेदार, अशोक आव्हाटे राजेंद्र वाकचौरे, निखील डांगे, वडांगळे सर, डॉ. तुषार गलांडे, प्रसाद आढाव, दिनेश पवार, चंद्रशेखर म्हस्के, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र आभाळे, अॅड. मनोज कडू, नारायण लांडगे, सोमनाथ आढाव, योगेश नरोडे, विकास वेंद्रे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram