गौतम पब्लिक स्कूलच्या खेळाडूंची क्रीडा क्षेत्रातील कामगीरी अभिमानास्पद – आशुतोष काळे

महाराष्ट्राच्या हॉकी संघात गोलकिपर म्हणून गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्याची निवड होणे हा शाळेच्या क्रीडा क्षेत्रासाठी एक मानाचा तुरा असून शाळेसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. शैक्षणिक वर्ष २०१८/१९ मध्ये सर्व क्रीडा प्रकारात गौतम पब्लिक स्कूलने उत्कृष्ट खेळाची परंपरा कायम राखत क्रीडा क्षेत्रातील आपला ध्वज नेहमीच उंचावत ठेवला असून गौतम पब्लिक स्कूलच्या खेळाडूंची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी अभिमानास्पद असल्याचे गौरवद्गार संस्थेचे विश्वस्त आशुतोष काळे यांनी काढले. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलचा हॉकी खेळाडू प्रतिक खडसे याची खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या हॉकी संघात गोलकिपर म्हणून निवड झाली होती. या स्पर्धा पुणे(बालेवाडी) व मुंबई येथे पार पडल्या. या स्पर्धेत देशातील आठ राज्यातील १७ वर्षाखालील संघ सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्राच्या संघात अहमदनगर जिल्ह्यातून एकमेव गौतम पब्लिक स्कूलच्या प्रतीक खडसे या विद्यार्थ्याची निवड झाली होती. प्रतीक खडसेने आपली निवड सार्थ ठरवत स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवीले. त्याबद्दल प्रतिक खडसेचे संस्थेचे विश्वस्त आशुतोष काळे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन छबुरावजी आव्हाड, सचिव सौ. चैतालीताई काळे शाळेचे प्राचार्य नूर शेख, क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे आदी उपस्थित होते. वर्षभरात झालेल्या एकूण १४ क्रीडा स्पर्धांमध्ये गौतम पब्लिक स्कूलने आपला सहभाग नोंदवला. यामध्ये हॉकी ४, फूटबॉल ४, सॉफ्टबॉल २, बेसबॉल २, व्हॉलीबॉल २ इत्यादी १४ संघांचा सामावेश आहे. सर्व संघांची जिल्हा पातळीवर निवड झाली. यापैकी गौतमच्या १० संघांनी जिल्हयाचे नेतृत्व विभागीय स्पर्धांमध्ये केले. यापैकी ४ संघांनी विभागाचे नेतृत्व करत गौतमचा झेंडा राज्य पातळीवर फडकावला. यापैकी गौतमच्या सब ज्यूनियर हॉकी संघाने ऑक्टोबर २०१८ मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय नेहरु हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करुन गौतमच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वर्षभरात झालेल्या सदर खेळांच्या स्पर्धांमध्ये गौतमच्या एकूण २२४ खेळाडूनी सहभाग घेतला पैकी १६० खेळाडूंची राज्य पातळीवर तर २३ खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी निवड झाली. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील गौतमच्या या खेळाडूंना भविष्यात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी याची मदत होणार असल्याची माहीती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली. क्रीडा क्षेत्रातील या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आशुतोष काळे, व्हा. चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ. चैतालीताई काळे, सहसचिव सौ. स्नेहलताताई शिंदे व सर्व संस्था सदस्य यांनी शाळेचे प्राचार्य नूर शेख सर्व क्रीडा शिक्षक व खेळाडूंचे कौतूक करुन अभिनंदन केले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram