गौतम पब्लिक स्कूलमध्ये कै.रविंद्र पाटील राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेस शानदार प्रारंभ

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलच्या माजी विद्यार्थी संघटना व गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१८ जानेवारी ते १९ जानेवारी २०१९ रोजी गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर राष्ट्रीय हॉकी खेळाडू कै.रवींद्र साहेबराव पाटील यांचे स्मरणार्थ १७ वर्षाखालील मुलांच्या भव्य राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेस प्रारंभ झालेला आहे. स्पर्धेचे उद्घाटन कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे, अभिषेक काळे, प्रविण पाटील, विजयराव जाधव, रामराव साळूंके, सुंदरराव काळे, शामराव जाधव, आण्णा काळे, देविदास वैराळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गौतमच्या लेझिम पथकाने सर्वांचे स्वागत केले. या स्पर्धेमध्ये राज्यातील नागपुर, अमरावती, रत्नागिरी, औरंगाबाद, नासिक, धुळे, भुसावळ, जळगाव, नंदूरबार, कोपरगाव व मालेगांव येथील हॉकी संघ सहभागी झाले असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली. यावेळी बोलतांना युवा नेते आशुतोष काळे म्हणाले की,राज्यात हॉकी खेळाची प्रसिद्धी होणे गरजेचे असून राज्यस्तरीय रवी पाटील हॉकी स्पर्धेद्वारे राज्यात हॉकी खेळाची मोठी प्रसिद्धी होत आहे. कै.रवि पाटील हे उत्कृष्ट हॉकीपटू होते. गौतमच्या हॉकी इतिहासात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. गौतम पब्लिक स्कूलमध्ये सर्व प्रकारचे खेळासाठी भव्य मैदान उपलब्ध असून त्यामुळे सर्वच क्रीडा प्रकारात गौतम पब्लिक स्कूलने आपला दबदबा कायम ठेवला हि कौतुकास्पद बाब आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेची भविष्यात व्याप्ती वाढणार असून त्यामुळे हॉकी खेळाचा प्रसार होण्यासाठी मोठा हातभार लागणार असल्याचे सांगितले . तसेच सर्व खेळाडूंना त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे यांनी गौतम पब्लिक स्कूलचा खेळाडू प्रतीक खडसे याने खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाकडून गोलकीपर म्हणून बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याचे कौतुक केले. स्पर्धेचा शुभारंभ सामना गौतम पब्लिक स्कूल व धुळे या संघात पार पडला यामध्ये गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने धुळे संघावर ३-१ ने मात करीत दिमाखात सुरुवात केली. सदर स्पर्धेकरीता गौतम पब्लिक स्कूलमध्ये सर्व खेळाडुंची शाळेतर्फे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram