महाविद्यालयीन जीवनात क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उज्वल भविष्य घडवा- सौ. चैतालीताई काळे

जीवनात यश प्राप्त करण्यासाठी वेळेचे नियोजन, समुहात काम करण्याची क्षमता, स्व:ताच्या व इतरांच्या भावना समजून घेणे, इतरांशी सुसंवाद साधने, नेतृत्व गुण यासारखी जीवन कौशल्य प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंगी असणे गरजेचे आहे. हि सर्व कौशल्य मैदानावर खेळत असतांना सहजपणे प्राप्त होऊन व्यक्तिमत्व घडत असते त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यानी महाविद्यालयीन जीवनात मैदानावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेवून उज्वल भविष्य घडवावे असा असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले. कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटीचे सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालयात सालाबाद प्रमाणे याहीवर्षी कै. सौ. सुशीलामाई काळे यांचे २० व्या स्मृती प्रित्यर्थ जिल्हास्तरीय वरिष्ठ आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उदघाटन संस्थेच्या सचिव व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना समिती प्रमुख प्रा.भाऊसाहेब कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन क्रिडा संचालक प्रा. डॉ.राजेंद्र चव्हाण यांनी केले. या स्पर्धेदरम्यान जिल्हयातील श्रीरामपूर, कोपरगाव, पुणतांबा, तळेगाव आदी महाविदयालयाच्या संघांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी सौ. चैतालीताई काळे यांनी दोनही संघातील खेळाडूंचा परिचय करून घेतला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ, क्रीडा संचालक डॉ. राजेंद्र चव्हाण, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक,खेळाडू, क्रीडा शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram