रक्तदानासारखे दुसरे श्रेष्ठ दान नाही- सौ. चैतालीताई काळे

विज्ञानाने अशक्य गोष्टी शक्य करून दाखविल्या आहेत. परंतु विज्ञानाकडून आजवर कृत्रीम रक्ताची निर्मिती होऊ शकली नाही हे सत्य नेहमी डोळ्यासमोर ठेवून आज प्रत्येकाने रक्तदान शिबिरात स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन रक्तदान केले पाहिजे. अपघात, आजार व छोट्या-मोठ्या शस्त्रक्रियेच्या वेळी रक्ताची नितांत आवश्यकता भासत असते त्यावेळी हे रक्त दुस-या व्यक्तीच्या शरिरातूनच उपलब्ध होते. जर वेळेवर रक्त मिळाले नाही तर वेळप्रसंगी शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णांना आपला जीवही गमवावा लागतो. त्यामुळे रक्तदानाचा थेट संबंध जीवन मरणाशी निगडीत असल्यामुळे रक्तदानासारखे दुसरे श्रेष्ठ दान कोणतेच नाही असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले. यावेळी त्यांनी स्व. सौ. सुशीलामाई यांच्या स्मृतींना उजाळा दिला. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाची भूमिका बजावणा-या स्व. सौ. सुशीलामाई काळे यांच्या २० व्या पुण्यस्मरणार्थ कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिटयुट मध्ये संजीवनी रक्त पेढी कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रसंगी सौ. चैतालीताई काळे बोलत होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिटयुट कार्यशाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या रक्तदान शिबिरात एकूण ७४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी प्राचार्य सुभाष भारती, संजीवनी रक्त पेढीच्या संचालिका डॉ. सौ. नीता पाटील, डॉ.सौ.जयश्री आढाव, श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य सुखदेव काळे, गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख, प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ, मुख्याध्यापक प्रकाश देशमुख, गुडघे सर्व प्राध्यापक, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अतुल नीळकंठ यांनी केले तर आभार आशिष काळे यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram