गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यांसाठी सर्वोतोपरी मदत करणार- आशुतोष काळे.

माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांनी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचे हक्काचे पाणी अबाधित रहावे. याबाबत जीवनभर संघर्ष केला. माजी आमदार अशोकराव काळे यांनीही पाण्याची लढाई सुरु ठेवली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी स्वखर्चातून गोदावरी कालव्यांची साफ सफाई केली होती. गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणाचे काम लोकसहभागातून सुरु होत आहे. हि खूप आनंदाची गोष्ट असून आपण मदतीच्या बाबतीत कुठेही कमी न पडता उजव्या आणि डाव्या कालव्याच्या नुतनीकरणासाठी सर्वोतोपरी मदत करणार अशी ग्वाही कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी दिली. गोदावरी उजव्या कालव्याचे लोकसहभागातून खोलीकरण व रुंदीकरण करणे यासाठी शनिवार दिनांक १९/१/२०१९ रोजी कोपरगाव येथील एरिगेशन बंगला येथे सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी बैठक आयोजित केली होती. या प्रसंगी ते बोलत होते. उजव्या कालव्याच्या रुंदीकरण व खोलीकरणासाठी सर्व पक्षीय कमिटी तयार करण्याचे काम चालू आहे. त्याप्रमाणे डाव्या कालव्याच्याही रुंदीकरण व खोलीकरणासाठी सर्वपक्षीय कमिटी तयार करून धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत नोंदणी करावी. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदतीसाठी सदैव तयार असल्याचे युवा नेते आशुतोष काळे यांनी या बैठकीत सांगितले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram