गौतम पब्लिक स्कूल राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत भुसावळ संघ विजयी नागपुर उपविजेता

स्व.सौ.सुशिलामाई काळे यांच्या २० व्या पुण्यस्मरणार्थ व कै.रवी पाटील यांच्या स्मरणार्थ गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यासह मराठवाडयातुन औरंगाबाद, खानदेशातील नंदुरबार, धुळे, जळगाव, भुसावळ विदर्भातुन नागपुर कोकणातील रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील नासिक, अहमदनगर ,कोपरगाव इत्यादी संघ सहभागी झाले होते. दोन दिवस सुरु असलेल्या गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर हॉकीप्रेमी प्रेक्षकांना हॉकी खेळातील चुरस व थरार अनुभवण्यास मिळाला. स्पर्धेत सर्वच आघाडयांवर विजय मिळवत भुसावळ व नागपुर संघानी अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. उभय सघांदरम्यान झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात भुसावळ संघाने नागपुर संघाचा २-० गोल फरकाने पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यजमान गौतम पबिलक स्कूलने अतिशय चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत तृतीय पारितोषिक मिळविले. संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघातील खेळाडूंची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या राज्यस्तरीय स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम संस्थेचे विश्वस्त व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे, सचिव सौ.चैतालीताई काळे, व्हा.चेअरमन छबुरावजी आव्हाड, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मान्यवंराचे हस्ते विजेत्या संघाना प्रथम, व्दितीय व तृतीय पारितोषिक, रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी संस्थेचे विश्वस्त कारभारी आगवण, सिकंदर पटेल,चंद्रकांत औताडे, भास्करराव आवारे, सदस्य ज्ञानदेव मांजरे, दिलीपराव चांदगुडे, उत्तमराव औताडे, तसेच माजी विद्यार्थी विजयराव जाधव, सचिन रोहमारे, सचिन गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी संघाची राहाण्याची व जेवणाची निःशुल्क व्यवस्था शाळेमार्फत करण्यात आली होती. हाउस मास्टर, प्रकाश भुजबळ, उत्तम सोनवणे, सुभाष वाणी व राजदिप यादव यांनी चोखण व्यवस्था ठेवली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली फिजीकल डायरेक्टर सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, कपिल वाघ, संजय इटकर, रिजवान पठाण, राजदिप यादव, प्रणव नेगी यांनी परीश्रम घेतले

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram