आत्मसन्मान जागृतीसाठी गुरुगोविंद सिंघाचे विचार मदतगार - आशुतोष काळे

शीख धर्मियांच्या पवित्र धार्मिक ग्रंथ “गुरू ग्रंथ साहिब” चे संकलन आणि लिखाण करणारे जेष्ठ संत गुरु गुरुगोविंद सिंघानी हे शीख समाजाचे दहावे गुरु गुरुगोविंद सिंघानी खालसा पंथाच्या माध्यमातून जातीय भेद नष्ट करून समानता प्रस्तापित केली. गुरुगोविंद सिंघाचे विचार प्रेरणादायक असून जीवनात आत्मसन्मान जागृतीसाठी गुरुगोविंद सिंघाचे अनमोल विचार मदतगार ठरू शकतात असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव येथे गुरुगोविंद सिंघ यांच्या जयंतीनिमित्त युवा नेते आशुतोष काळे यांनी शीख बांधवांचे पवित्र धर्मस्थळ गुरद्वारा येथे जावून गुरुगोविंद सिंघ यांच्या समाधीवर चादर चढवून अभिवादन केले त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना ते बोलत होते. याप्रसंगी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सौ. पुष्पाताई काळे व युवा नेते आशुतोष काळे यांनी शीख धर्मगुरुंचे पूजन करून आशीर्वाद घेतले. शीख बांधवांच्या वतीने महानगर किर्तन आयोजित केले होते यावेळी “गुरु ग्रंथ साहिबा” या पवित्र ग्रथांची मिरवणूक काढण्यात आली. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने यावेळी खिचडीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सेवासिंग सहानी, पप्पूसिंग पोथीवाल, चंद्रमोहन पापडेजा, संतसिंग ठकराल, दीपक बजाज, मंटू लोंगाणी,महेश मंटाला, तानेश बत्रा, गुलशन होडे आदींसह सर्व सेवादार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram