राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकत दाखवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे – आशुतोष काळे

जनतेला केंद्रात व राज्यात शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे हित साधणारे सरकार पाहिजे. अच्छे दिन येणार या आशेवर बसलेल्या जनतेचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. केंद्रातील व राज्यातील सरकारवर जनतेचा विशेषत: शेतक-यांचा प्रचंड रोष आहे. कोपरगाव तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे येणा-या निवडणुकीत मतदार सत्ताधारी पक्षाला धडा शिकविणारच असून निश्चित परिवर्तन होणार आहे.आगामी निवडणुकांना सामोरे जातांना कोपरगाव तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकत दाखवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवानेते आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव येथे तीळगूळ वाटप कार्यक्रम व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी निवडी प्रसंगी युवा नेते आशुतोष काळे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, निवडणुका केव्हाही लागू शकतात. हे कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन राष्ट्रवादीची काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवावी. कार्यकर्त्यांनी मनात निर्धार केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे आणि कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकत दाखवुन द्या असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी निवडी करण्यात आल्या यामध्ये रमेश गवळी राष्ट्रवादी जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष, युवक सरचिटणीस- अॅड.मनोज कडू, कोपरगाव तालुका विद्यार्थी कार्याध्यक्ष– निखील डांगे, शहर अल्पसंख्याक सेल अध्यक्ष– जावेद शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी शहर अध्यक्ष– स्वप्नील पवार आदी पदाधिका-यांच्या निवडी करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनिल शिलेदार, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, संतोष चवंडके, कृष्णा आढाव, नवाज कुरेशी, श्री.आढाव, रावसाहेब लाठे, डॉ. तुषार गलांडे, अंबादास वडांगळे, राहुल देवळालीकर, सचिन परदेशी, चंद्रशेखर म्हस्के, गणेश ललकारे, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके, मुकुंद इंगळे, सतीश शिंदे, बाला गंगूले, निलेश पाखरे, संदीप कपिले, धनंजय कहार, वाल्मिक लहीरे, ऋषिकेश खैरनार आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram