संधीचा उपयोग करून उज्वल भविष्य घडवा – आशुतोष काळे

मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देवून ग्रामीण भागातील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्याकडे सौ. सुशीलामाईंनी केलेल्या सततच्या मागणीतून ग्रामीण भागात मुलींसाठी महाविद्यालय सुरु होऊन ग्रामीण भागातील मुली उच्च शिक्षण घेत आहे. त्यामुळे सौ. सुशीलामाईंचे ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण देण्याचा मनोदय पूर्ण झाला असून महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी उपलब्ध संधीचा लाभ घेवून आपले उज्वल भविष्य घडवावे असे प्रतीपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. सुरेगाव-गौतमनगर येथे राधाबाई काळे कन्या विद्या मंदिरात वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सचिव अॅड.रंजनाताई गवांदे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य संभाजीराव काळे, कचरू कोळपे, सुरेगाव सरपंच शशिकांत वाबळे, सदस्य डॉ.आय.के.सय्यद, अशोकराव गवांदे, बाळासाहेब ढोमसे, प्राचार्या डॉ. विजया गुरसळ, मुख्याध्यापक काळे एस. एच. मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अॅड.रंजनाताई गवांदे म्हणाल्या की, सौ.सुशीलामाई काळे यांनी सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल कामगिरी करतांना ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले. असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो परंतु कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या सोबत सौ.सुशीलामाई यांची खंबीर साथ असल्यामुळे ग्रामीण भागातील मुलींचे उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय पूर्ण झाले असल्याचे सांगितले. तसेच आपण साजरे करीत असलेल्या सण-उत्सव साजरे करण्यामागे एक विशिष्ट उद्देश असून हा उद्देश समजून घ्या परंतु अंधश्रद्धेला बळी पडू नका असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती काकडे सी.ए. यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय मोरे आर. एस. यांनी करून दिला. सूत्रसंचालन रुपवते ए.व्ही. व म्हस्के आर.एम. यांनी केले तर आभार गाडे एम.के. यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थिनी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram