रयत संकुल गौतमनगर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलमाई काळे महाविद्यालय, गौतम पब्लिक स्कुल, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, तसेच रयत संकुल गौतमनगरच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर, श्री. छत्रपती संभाजी विद्यालय आदी शाळा - महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना आशुतोष काळे म्हणाले की, विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील नागरिकांना संविधानाने समान हक्क दिले आहेत. आपल्या लाभलेले हक्क व कर्तव्यांचा वापर देशहितासाठी करून शांतता, समता व बंधुता ही मूल्ये जोपासावी व आपल्या हक्कांचा वापर करत असतांना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवावी असा मौलिक संदेश आशुतोष काळे यांनी दिला. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सुरक्षा विभाग व शाळांच्या एन.सी.सी., कब बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना युवानेते आशुतोष काळे म्हणाले की, असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील शिंदे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक गिरीश जगताप, सेक्रेटरी सुनील कोल्हे. ऑफिस सुपरिटेंडेट बाबा सय्यद, सर्व पदाधिकारी,प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ, प्राचार्य सुभाष भारती, नूर शेख, एस. एच. काळे. प्राचार्या सौ. सी. ए. काकडे. मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे सर्व विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram