गौतम पब्लिक स्कूलच्या प्रवाहात येणारा प्रत्येक विद्यार्थी हिरा होऊनच बाहेर पडतो, गौतम पब्लिक स्कुलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी ग्रामीण भागातील शेतक-यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी ग्रामीण भागात गौतम पब्लिक स्कूल स्थापन करून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. काळे साहेबांनी आमची पिढी घडविली यापुढील पिढी घडविण्याची जबाबदारी संस्थेचे विश्वस्त युवा नेते आशुतोष काळे यांच्या खांद्यावर असून ही जबाबदारी त्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली आहे. गौतम पब्लिक स्कूल मध्ये शिकत असतांना शाळेची शिस्त व आदरयुक्त दरारा यामुळे या गौतम पब्लिक स्कूलच्या प्रवाहात येणारा प्रत्येक विद्यार्थी हिरा होऊनच बाहेर पडतो अशा प्रतिक्रिया गौतम पब्लिक स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व विश्वस्त युवानेते आशुतोष काळे व सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून गौतम पब्लिक स्कुलच्या १९७१ ते २०१९ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच गौतम पब्लिक स्कुलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी या मेळाव्यास १९७१ पासून आजपर्यंतचे गौतम पब्लिक स्कुलमध्ये शिक्षण घेतलेल्या राज्यभरातून आलेले हजारो विद्यार्थी तसेच गौतम पब्लिक स्कुलमध्ये ज्ञानदानाचे काम केलेले माजी शिक्षकही उपस्थित होते.यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली. गौतम पब्लिक स्कुलमुळे त्या काळातही ग्रामीण भागातील विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊ शकले याबद्दल त्यांनी माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे साहेबांचे आभार मानले. तसेच विश्वस्त युवानेते आशुतोष काळे व सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या नेतृत्वाखाली शाळेची झालेली प्रगती पाहून शाळा योग्य नेतृत्वाच्या हातात असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. यावेळी बोलताना युवानेते आशुतोष काळे म्हणाले की, माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या दुरदृष्टीतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी गौतम पब्लिक स्कुल सुरू झाले. त्यानंतर या शाळेतून अनेक विद्यार्थी शिकून आज उच्च पदावर काम करत आहेत ही शाळेसाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. मी देखील प्राथमिक शिक्षण गौतम पब्लिक स्कुलमध्ये घेतले असून आज या मेळाव्याच्या निमित्ताने सर्व जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या रहात असल्याचे सांगितले. मेळाव्यासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देला. शाळेचा सर्व परिसर, आपला वर्ग, जुने मित्र यांच्या भेटीने अनेक माजी विद्यार्थी भावुक झाले होते. संस्थेच्या सचिव व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.याच दिवशी योगायोगाने शाळेचे प्राचार्य नूर शेख यांचा वाढदिवस असल्यामुळे विश्वस्त युवानेते आशुतोष काळे व सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा केक भरवून वाढदिवस साजरा केला.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram