पुन्हा मैदाने खेळाडूंनी गजबजली पाहिजे – आशुतोष काळे

मोबाइलच्या गरजेचं रुपांतर व्यसनात कधी झालं हे तरुणाईला कधी कळलंच नाही. त्यामुळे आजची तरून पिढी मैदानावर दिसत नाही. मोबाईलच्या अति वापरामुळे आजचा तरूण मैदानी खेळ विसरत चालला आहे का? असा प्रश्न मनाला पडत असतो. तंत्रज्ञानाचा गरजेपुरताच वापर करावा. आजच्या तरुणाईने मोबाईलवरील पब्जी सारख्या एका जागी बसून खेळल्या जाणा-या खेळावरील लक्ष कमी करून मैदानी खेळाला महत्त्व द्यावे. युवा वर्गाला जीवनात अपेक्षित ध्येय साध्य करायचे असेल तर पुन्हा मैदाने खेळाडूंनी गजबजली पाहिजे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. राजा छत्रपती आदेश प्रतिष्ठान पोहेगाव व महाराष्ट्र राज्य असोसिएशन यांच्या मान्यतेने ऑल इंडिया महिला व पुरुष राष्ट्रीय शुटींग दिवस-रात्र व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उदघाटन युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की,पोहेगाव येथे राष्ट्रीय शुटींग, व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे ग्रामीण भागातील व्हॉलीबॉल खेळाडूंना ऊर्जा मिळणार असून या स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. राजा छत्रपती आदेश प्रतिष्ठानचे नंदकिशोर औताडे म्हणाले की, युवा नेते आशुतोष काळे यांना तरुणाई विषयी आत्मीयता आहे. त्यांच्या प्रेरणेतून राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे सांगितले. या स्पर्धेत मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब तसेच महिलांचे सांगली, पुणे आदी जिल्ह्यातील एकूण साठ संघ सहभागी झाले असून विजेत्या संघांना मोठ्या रोखरक्कमेचे बक्षीस देण्यात येणार आहे. याप्रसंगी कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, सभापती सौ. अनुसया होन, जी.प.सदस्या सोनाली रोहमारे, आनंदराव चव्हाण, सचिन रोहमारे, चंद्रकांत औताडे, मधुकर औताडे, सचिन मुजगुले, राहुल रोहमारे, जयंत रोहमारे, सोपान आभाळे, योगीराज देशमुख, गंगाधर खोमणे,कृष्णा शिलेदार, संजय शिंदे, काकासाहेब शिंदे, प्रकाश औताडे, योगेश औताडे, रोहिदास होन, नांदुभाई भोईटे, जावेद मनोरे, दिपीप गोयल, बाळासाहेब फाळके, दशरथ गायकवाड, प्राचार्य गमे, दिनानाथ जोंधळे, नरेद्र रजपूत,राजा छत्रपती आदेश प्रतिष्ठानचे नंदकिशोर औताडे व सर्व सदस्य तसेच फुटबॉलप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram