ज्येष्ठ नागरिकांचे कार्य समाजोपयोगी - आशुतोष काळे

ज्येष्ठ नागरिक सेवा मंच रुग्णांच्या गरजा ओळखून त्यांचे उपचार व निदान करण्याकरिता वेळोवेळी विविध आजारांवरील शिबिरांचे आयोजन करत असते. समाजाला लाभदायक असणारे उपक्रम ते राबवीत असल्यामुळे निश्चितच त्यांचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन युवानेते आशुतोष काळे यांनी केले. कै. मोहिनी विजय बंब यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ नागरिक सेवा मंच, कै. केशरबाई महानुभाव नर्सिंग कॉलेज वं श्री आनंदहृषीजी नेत्रालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर कुलकर्णी होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणले की, तरुणांनी प्रेरणा घ्यावी असे काम ज्येष्ठ नागरिक सेवा मंच कोपरगाव शहरात करत आहे. अशाच प्रकारे यापुढेही सर्वसामान्य गरजू रुग्णांसाठी आपले अनमोल कार्य ते करीत राहतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच फोन नंबर डायरी व रेल्वे - विमान वेळापत्रकाचे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या शिबिरामध्ये २५० रुग्णाची नेत्र तपासणी झाली असून त्यापैकी १५ रुग्ण मोतीबिंदूने बाधित असल्याचे तपासणीमध्ये निष्पन्न झाले आहे. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे अध्यक्ष छोटूभाई जोबनपुत्र, उपाध्यक्ष दत्तात्रय कंगले, हिरालाल महानुभाव, कैलासशेठ ठोळे, चंद्रकांत ठोळे, उत्तम शहा, पी.टी. बोरावके, सौ. सुधाभाई ठोळे, राजेंद्र वाकचौरे, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे सर्व सभासद, नर्सिंग कॉलेजचे शिक्षक, विद्यार्थी व शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेले रुग्ण मोठया संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram