आशा सेविका काळजी घेणाऱ्या बहिणी - सौ. चैतालीताई काळे

आशा स्वयंसेविका करत असलेले कार्य हे समाजासाठी विशेषतः गरोदर स्त्रिया व बालकांसाठी अतिशय मोलाचे असून त्यांच्या रूपाने काळजी घेणाऱ्या बहिणी सर्वांना मिळाल्या असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले. कोपरगाव येथे पंचायत समितीच्या वतीने आशा दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती अनुसयाताई होन होत्या. यावेळी बोलतांना त्या पुढे म्हणाल्या की, कधी कधी मातांना माहीत नसते की आपल्या बाळाला कधी कोणते लस अथवा औषधे द्यायची आहेत पण आशा सेविकांना त्यांच्या भागातील प्रत्येक गरोदर अथवा प्रसूत झालेल्या महिलेची सर्व माहिती असते. गरोदरपणापासुन ते बाळ मोठे होईपर्यंत आणि त्यानंतरही आशा सेविका त्यांचे कार्य अतिशय चोखपणे करत असतात त्यामुळे आशा सेविकांचे काम हे एखाद्या मातेपेक्षा कमी नक्कीच नाही. आशा सेविका भावी पिढी घडवण्याचे अनमोल कार्य करत आहेत अशा शब्दात त्यांनी आशा सेविकांचा गौरव केला. १ फेब्रुवारी हा दिवस आशा दिवस म्हणून साजरा केला जातो. आशा सेविकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने आशा दिनाचे औचित्य साधून कोपरगाव येथे पंचायत समितीच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील आशा सेविकांसाठी रांगोळी स्पर्धा, आशा सेविका पारितोषिक वितरण आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्कृष्ट आशा सेविकांचा तसेच पंचायत समितीतर्फे आशा सेविकांसाठी आयोजित रांगोळी स्पर्धा विजेत्या सेविकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मागील एक वर्षात ज्या आरोग्य केंद्रामधील एकही बालक दगावले नाही अशा सर्व आशा सेविकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती अनुसयाताई होन, जी.प. सदस्य राजेश परजणे, सोनालीताई रोहमारे, पंचायत समिती सदस्य अर्जुन काळे, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाटे, सौ. बडदे मॅडम, रोहिदास होन तसेच कोपरगाव तालुक्यातील सर्व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram