शासकिय चित्रकला परीक्षेत गौतम पब्लिक स्कूलचा निकाल १०० %.

सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या शासकिय चित्रकला परीक्षांचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. इलेमेंटरी चित्रकला परीक्षेत शाळेतील एकूण ६६ विद्यार्थी व इंटरमीजीएट परीक्षेस ५७ विद्यार्थी बसले होते. या परीक्षेत एकूण १३९ विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे. शाळेचा १००% निकाल लागलेला आहे. या परीक्षेत अहिरे वैभव, कु.भारती निधी, डुंबरे प्रथमेश, जामदार ऋतीक, कु.कुदाळ अनुष्का, कु.शेख आनम, सुर्यवंशी हर्षल हे ७ विद्यार्थी ‘अ’ श्रेणीत तर ३० विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहे. शासकिय चित्रकला परीक्षेत कोळपेवाडी केंद्रातून गौतम पब्लिक स्कूलने सर्व शाळांच्या तुलनेत सर्वोच्च निकालाची पंरपरा कायम राखली आहे.सध्याच्या युगात करिअर करण्याच्या सर्वाधीक संधी कलाक्षेत्रात उपलब्ध आहेत. कलाक्षेत्राचा अर्थ चित्रकारीता, गायन, नृत्य, संगीत अशा अनेक क्षेत्रात कलाकारांसाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत आणि या सर्व कला प्रकारामध्ये गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आपला ठसा उमटवत आहे. संस्थेचे विश्वस्त आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत आहे. विद्यार्थ्यांमधील अभिव्यक्ती सृजनशील करण्यासाठी गौतम पब्लिक स्कूलमध्ये सतत वेगवेगळे प्रयोग करून शाळेच्या नावलौकीकात भर टाकत असल्याची अशी माहीती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे कला शिक्षक गोरक्षनाथ चव्हाण, सुपरवायझर ज्योती शेलार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यानी मिळविलेल्या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्याचे व कला शिक्षकाचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, विश्वस्त आशुतोष काळे, सचिव सौ.चैतालीताई काळे, व सर्व संस्था सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram