शेतक-यांच्या लेकींना उपोषण करावे लागते हे दुर्देव – सौ.चैतालीताई काळे

शेतकरी संपाचे गाव अशी ओळख असलेल्या पुणतांबा गावातील शेतक-यांच्या लेकींनी मागील चार दिवसापासून अन्नत्याग आदोलन सुरु केले आहे. या शेतक-यांच्या लेकींची जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी भेट घेवून त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. यावेळी बोलतांना सौ. चैतालीताई काळे म्हणाल्या की, आजच्या परिस्थितीत शेती करणे खूप अवघड झाले असून शेतक-यांसाठी महाविद्यालयात शिक्षण घेणा-या शेतक-यांच्या लेकींना उपोषण करावे लागते हे दुर्देव आहे. राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील तीन महाविद्यालयीन विद्यार्थींनिंनी शेतक-यांचा सातबारा कोरा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतक-यांच्या शेतमामाला भाव मिळावा व दूध दर ५० रुपये प्रती लिटर करावा आदी मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या शेतक-यांच्या लेकींची सौ. चैतालीताई काळे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी या अन्नत्याग करणा-या महाविद्यालयीन विद्यार्थींनिंचे कौतुक करतांना त्या म्हणाल्या की, अशा प्रकारचे अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी मोठी हिम्मत असावी लागते असे सांगत त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांच्यावतीने जाहीर पाठींबा दिला.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram