मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची ताकत निर्माण करा - आशुतोष काळे

जीबनात कोणते ध्येय गाठायचे याचा मनात निश्चय केला पाहिजे. जे ध्येय साध्य करायचे आहे त्यासाठी जीव ओतून काम करा. आयुष्यात कधी ठेचाही लागू शकतात पण आपला आपला मार्ग कधी बदलू नका व कधीही जिद्द सोडू नका. आयुष्यातील प्रत्येक वळणावर जेव्हा जेव्हा अपयशाला सामोरे जावे लागते तेव्हा खचून न जाता जिद्दीने प्रयत्न करा.आपल्या मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची ताकत निर्माण करा तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असा मौलिक संदेश युवा नेते आशुतोष काळे यांनी विद्यार्थ्यांना दिला. सौ. सुशीलामाई काळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, गौतमनगर यांचेवतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण युवानेते आशुतोषद काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी युवानेते आशुतोष काळे यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे,शिवाजीराव वाबळे, कचरू कोळपे, बाबुराव कोल्हे, संतूजी गवळी, पोपटराव गुंड, भाऊलाल कार्ले,श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य सुखदेव काळे, राधाबाई काळे कन्या विद्यालयाच्या प्राचार्या काकडे सी.ए., श्री. छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram