कष्टाचे महत्व जाणणारा व प्रामाणिकपणा जपणारा आयुष्यात कधीही अयशस्वी होत नाही-आशुतोष काळे

आपले भविष्य घडविण्यासाठी सभोवतालचे जग बदलण्याची वाट कधीच पाहू नका. आपले भवितव्य घडविण्यासाठी व आपल्या प्रगतीसाठी आपल्यालाच बदलावे लागेल. समाजात काय योग्य काय अयोग्य याकडे बारकाईने बघायला शिका. जगात कष्टाचे महत्त्व जाणणारा व प्रामाणिकपणा जपणणारा कधीच अयशस्वी होत नाही हे नेहमी लक्षात ठेवा असा मौलिक संदेश कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त युवानेते आशुतोष काळे यांनी पदवीग्रहण समारंभात स्नातकांना दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने चतुर्थ पदवीदान समारंभ युवानेते आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य प्राध्यापक डॉ. के. एल. गिरमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिक्षण पूर्ण झाले म्हणून जबाबदारी संपत नाही. समाजाप्रती असलेली खरी जबाबदारी तर शिक्षण पूर्ण झाल्यावर आता तुमच्या खांद्यावर आली असून तुम्ही आता समाजाचे जबाबदार नागरिक झाला आहात याची जाण ठेवा असे आवाहन केले. यावेळी डॉ.के.एल. गिरमकर म्हणाले की,रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेतल्यामुळे मला नेहमीच कर्मवीर शंकरराव काळे यांचे विचार ऐकायला मिळाले. त्यांच्या प्रेरणादायी विचारातून माझे आयुष्य घडत गेले व मी जीवनात यशस्वी झालो. विद्यार्थी दशेपासूनच चांगले वाचायला, ऐकायला शिका. २५% ज्ञान व बुद्धी प्रत्येकाला जन्मजात प्राप्त असते, परंतु ७५% ज्ञान व कौशल्य समाजाकडून शिकायला व अनुभवातुन प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.सौ. निर्मला कुलकर्णी व प्रा.उमाकांत कदम यांनी केले तर आभार प्रा. सिकंदर शेख यांनी मानले. यावेळी संस्थेचे माजी उपाध्यक्ष कारभारी जाधव,विश्वस्त भास्करराव आवारे, सिकंदर पटेल, प्राचार्या डॉ. विजया गुरसळ, प्रा.पी.बी. मोरे,सर्व प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram