सौ. चैतालीताई काळे यांना “राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार” जाहीर

जाणीव सांस्कृतिक अभियान या राष्ट्रीय उपक्रमशील संस्थेच्या वतीने समाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व प्रशासकीय आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा “राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार” अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांना जाहीर झाला आहे. जाणीव सांस्कृतिक अभियान या संस्थेने धैर्य, उत्कृष्ट प्रशासन कौशल्य तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देवून अनेक समाजातील विभूतींना गौरविलेले आहे. या संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, व्यक्तिमत्व विकास शिबीर, उद्योजकता मार्गदर्शन शिबीर आदी उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी राज्यस्तरीय संमेलन आयोजित करण्यात येते. विधवा महिला, वृद्ध व गरजू महिलांच्या पुनर्वसनासाठी मदत संस्थेच्या माध्यमातून मदत केली जाते. साक्षरता मूल्यशिक्षण या विषयांवर शाळा महाविद्यालयांमध्ये व्याख्याने आयोजित करून समाज प्रबोधन कार्यक्रम राबवले जातात. अशाच प्रकारचे समाजामध्ये सामजिक काम करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा मिळावी व त्यातून समाजाच्या वंचित घटकांचा विकास व्हावा या उद्देशातून सौ. चैतालीताई काळे यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार दिनांक १७ फेब्रुवारी २०१९ रोजी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीरजी तांबे यांच्या अध्यक्षतेखाली परशुराम सायखेडकर नाट्यमंदिर, नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात माजी राज्यमंत्री श्री. विनायकदादा पाटील व वीरमाता सौ. नीलाताई कौतिक आमले यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, अंतराळ अभ्यासक अपूर्वा जाखडी, महसूल विभागाच्या अप्पर सचिव श्रीमती सोनलस्मित पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram