योग्य मार्गदर्शनच विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविते - सौ. चैतालीताई काळे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे. आधुनिक युगात स्पर्धा खूप मोठी असली तरी अनेक पर्याय व संधीही उपलब्ध आहेत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करीत असतांना भविष्याच्या दृष्टीने आपण कोणता पर्याय निवडावा असा विद्यार्थ्यांच्या मनात ज्यावेळी संभ्रम निर्माण होतो अशावेळी पालकांनी विद्यार्थ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून मार्गदर्शकाची भूमिका बजावली पाहिजे. कारण योग्य मार्गदर्शनच विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविते असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांनी केले. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाचा पालक मेळावा संस्थेच्या सचिव व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी पुलवामा येथे शहीद झालेल्या सी.आर.पी.एफ.जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. पुढे बोलतांना सौ. चैतालीताई काळे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेऊन अभ्यास करावा तसेच आई वडिलांनाही आपल्या मुलांना वेळोवेळी आपण घेत असलेल्या कष्टांची जाणीव करून द्यावी. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे शिक्षकांसोबत पालकांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच आजची तरुण पिढी ही सोशल मीडियाच्या विळख्यात अडकत चालली आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. पदवी मिळवल्यानंतर पुढे काय करायचे हे विद्यार्थ्यांनी अगोदरच ठरवले पाहिजे. पुढचा मार्ग निवडण्यासाठी पालकांनी व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मदत करावी. महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना पदवीनंतर काय केले पाहिजे याचे संपूर्ण मार्गदर्शन देण्याची ग्वाही त्यांनी उपस्थित पालकांना दिली. पालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, माजी खासदार स्व. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी जर कोळपेवाडी सारख्या ग्रामीण भागात हे महाविद्यालय सुरू केले नसते तर शेतक-यांच्या मुली उच्च शिक्षण घेवू शकल्या नसत्या. ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय केल्याबद्दल कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचे पालकांनी आभार मानले. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचा शिक्षणाचा वसा संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे यांनी समर्थपणे सांभाळला व संस्थेचे विश्वस्त युवा नेते आशुतोष काळे व सचिव सौ.चैतालीताई काळे अतिशय समर्थपणे पुढे चालवत असल्याचे आपल्या मनोगतात नमूद केले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram