निष्क्रिय आमदारांमुळे शेतक-यांना सरणावर बसण्याची वेळ, दुष्काळाच्या यादीत सामाविष्ट होण्यापासून वंचित असणा-या गावाची जबाबदारी लोकप्रतिनिधी घेणार का?- आशुतोष काळे

कोपरगावतालुक्याच्या शेजारील वैजापूर, सिन्नर, येवला, राहाता,संगमनेर हे तालुके शासनाकडून दुष्काळग्रस्त जाहीर होतात परंतु स्वत:ला लोकप्रिय म्हणवून घेणा-या कोपरगाव तालुक्याच्या आमदार हवेत असल्यामुळे कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत सामाविष्ठ होण्यापासून वंचित राहिला असून निष्क्रिय आमदारांमुळेच कोपरगाव तालुक्यातील शेतक-यांना जिवंतपणी सरणावर बसण्याची वेळ आली असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्याच्या आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता केली. कोपरगाव तालुकयातील जिल्हा परिषद चांदेकसारे गटातील देर्डे-चांदवड ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुशोभित केलेल्या दशक्रिया विधी घाट जागेचा लोकार्पण सोहळा तसेच गाव अंतर्गत विविध रस्त्यांचे कॉक्रीटीकरण, गटार बांधकाम, व रस्ते दुरुस्ती कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसया होन होत्या. यावेळी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात व त्यानंतर उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीत शहीद झालेल्या जवानांना आशुतोष काळे यानी श्रद्धांजली वाहीली. ते पुढे म्हणाले की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांच्या पक्षाचे सरकार असतांना तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून का वगळण्यात आले याचा जाब तालुक्याच्या आमदार प्रशासनाला विचारू शकल्या नाही हे तालुक्याच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदेकसारे जिल्हा परिषद गटातील,वेस, सोयेगाव, धोंडेवाडी, रांजणगावदेशमुख, बहादरपूर, बहादराबाद, शहापूर, मनेगाव, काकडी,मल्हारवाडी आदी गावातही दुष्काळाची दाहकता मोठी आहे. या भागातील जनता मागील काही वर्षापासून सातत्याने दुष्काळाचा सामना करीत आहे. यावर्षी तर दुष्काळी परिस्थिती खूपच अवघड असल्यामुळे या भागातील शेतकरी दुष्काळ जाहीर करावा म्हणून रस्त्यावर उतरले होते. आंदोलनकर्ते शेतक-यांचा आक्रमक जनरेटा बघून शासनाच्या प्रतिनिधींनी आंदोलनकर्ते शेतक-यांची भेट घेवून त्यांना आश्वासित केले होते. संबंधित शेतक-यांनी आंदोलन मागे घेते वेळेस संबंधित गावे दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यास जिवंतपणी सरणावर बसून आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला होता. त्यामुळे प्रशासनाने वास्तव परिस्थितीचा योग्य तो अहवाल शासनाकडे पाठवून या गावांना दुष्काळग्रस्त यादीत समावेश केले. परंतु तालुक्याच्या आमदारांनी नेहमीप्रमाणे मंत्र्यासोबत काढलेल्या जुन्या फोटोंचा वापर करून नेहमीप्रमाणे न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा केलेला प्रयत्न हा आंदोलनकर्त्या शेतक-यांचा अपमान आहे. त्यांना जर श्रेय घेण्याची एवढी हौस आहे तर कोपरगाव तालुक्यातील ज्या गावांना दुष्काळाच्या यादीतून वगळले त्या गावांच्या होणा-या नुकसानीची जबबादारी तालुक्याच्या लोकप्रतिनिधी स्वीकारणार का? असा सवाल विचारला आहे. शेतक-यांना होत असलेल्या त्रासाची जाणीव मुंबईत बसून समजत नाही त्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक ही गोदावरी कालव्याच्या कार्यक्षेत्रातच व्हावी असा माझा नेहमीच आग्रह असल्याचे आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती, सौ. अनुसयाताई होन, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली रोहमारे, सरपंच सौ. ज्योती बर्डे, उपसरपंच सौ. प्रतिभा होन, चांगदेव होन, प्रीतम मेहेत्रे, तुकाराम होन,पोपट गुंड, चंद्रभान बडे, रोहिदास होन, राहुल रोहमारे, काशिनाथ डुबे, योगीराज देशमुख, सुनील मोकळ,पोपट कोल्हे, बाबुराव कोल्हे, सोमनाथ भवर, रामचंद्र कोल्हे, जयवंत होन, डॉ. देशमुख, दिगंबर बडे, बाबासाहेब मेहेत्रे, भरत शिलेदार, शाखा अभियंता गायकवाड एस. जी. ग्रामसेवक देवेंद्र वारुळे आदी मान्यवरांसह पंचक्रोशीतील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांगदेव होन यांनी केले तर आभार प्रीतम मेहेत्रे यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram