माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून सौ. सुशिलामाई काळे महाविद्यालयाचा वटवृक्ष - आशुतोष काळे

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सौ. सुशिलामाईंनी कोळपेवाडी सारख्या ग्रामीण भागात महाविद्यालय सुरू करण्याचा आग्रह माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांकडे केल्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालयाच्या माध्यमातून मुलींबरोबर परिसरातील मुलांच्याही उच्च शिक्षणाची सोय झाली. २००२ साली १४२ विद्यार्थी संख्या असतांना या महाविद्यालयाचे रोपटे लावले गेले. आज महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या एक हजारावर जावून पोहोचली असून माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाचा वटवृक्ष झाला असल्याचे प्रतिपादन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या २००२ ते २०१८ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे, एम. टी. रोहमारे, प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ उपस्थित होत्या. यावेळी पुलवामा येथे आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज करतांना ते पुढे म्हणाले की, महाविद्यालय विनाअनुदानित असूनही विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाचे पथकही आपल्या महाविद्यालयाचे सातत्याने कौतुक करत असते ही आनंदाची गोष्ट आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना नेहमीच संस्कार, शिस्त, जीवनाची मूल्ये शिकविण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे आज या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात चांगल्या पदावर नोकऱ्या करत असून काही विद्यार्थी परदेशात नौकरी करीत आहे ही मनाला समाधान देणारी गोष्ट आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने या देशाचे उत्तम नागरिक घडविले असून काही विद्यार्थी करीत असलेले सामाजिक कार्य पाहून हे महाविद्यालय सुरु करण्याचा उद्देश साध्य झाला असल्याचे आशुतोष काळे यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे म्हणाल्या की, महाविद्यालयीन जीवनात जोडलेल्या मित्रांचे आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत मोठे योगदान असून त्यांना आपण कधीही विसरत नाही. आज विविध ठिकाणी कामानिमित्त कार्यरत असलेले सर्व मित्र या मेळाव्यामुळे एकमेकांना भेटू शकले याचा मनाला आनंद वाटत असल्याचे सांगितले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी विद्यार्थ्यांनी चहा पिण्याचे कट्टे, एकत्र बसून केलेल्या गप्पांची ठिकाणे, क्लासरूम, खेळाचे मैदान, सांस्कृतिक कार्यक्रमाचे सभागृह, जुने मित्र व शिक्षक, शिक्षण घेत असतांना केलेली धमाल, आलेले अनुभव, अशा सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात घेतलेले अनुभव व आठवणी पुढे येऊन सांगितल्या, तर अनेक विद्यार्थी गटागटाने गप्पांमध्ये रंगून गेले. विद्यार्थ्यांच्या या मेळाव्याने महाविद्यालयाचा परिसर फुलून गेला होता. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी युवा नेते आशुतोष काळे यांच्या सोबत सेल्फी काढून आपला आनंद द्विगुणीत केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. उमाकांत कदम व प्रा. विशाल पोटे यांनी केले. आभार प्रा. डॉ. सौ. निर्मला कुलकर्णी यांनी मानले. यावेळी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram