मढी खुर्दच्या सरपंच वैशाली आभाळे यांचा आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार

कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वैशाली प्रमोद आभाळे यांना नुकताच उदयोन्मुख नेतृत्व म्हणून सरपंच ऑफ द इयर या पुरस्काराने हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी श्रीधर आभाळे, भाऊसाहेब कु-हाडे, सोपानराव आभाळे, उत्तमराव कु-हाडे,बिपीन गवळी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. लोकमत परिवाराकडून दरवर्षी जिल्ह्यातील सरपंच म्हणून कार्य करीत असलेल्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. यामध्ये ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, उदयोन्मुख नेतृत्व, इ प्रशासन लोकसहभाग, शैक्षणिक सुविधा, रोजगार निर्मिती, स्वच्छता, कृषी तंत्रज्ञान, आरोग्य, वीज व्यवस्थापन, पायाभूत सेवा, जल व्यवस्थापन आदी बाबींमध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या सरपंचाना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. मढी खुर्द च्या सरपंच सौ. वैशाली आभाळे यांनी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकाच वर्षात गावाला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी काम सुरु केले. पाणीपुरवठा योजनेचे थकलेले अडीच लाख रुपयांचे वीजबिल वसुली करून जवळपास दोन लाख रुपये जमा करून पाणीपुरवठा योजना सुरु केली. उर्वरित थकबाकी जमा करण्यासाठी महावितरणला हप्त्यात रक्कम भरण्याची हमी दिली. पाणी पुरवठा योजनेसाठी सौर उर्जेचा वापर करून वीज बिल कपात केली. अशा प्रकारे अनेक उपक्रम राबवून मढी गावाला सर्व सोयींनी परिपूर्ण करण्याचा अल्पावधीतच केलेला प्रयत्न कौतुकास्पद असून त्यांच्या कार्याला पुढे प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा लोकमत परिवाराकडून सन्मान करण्यात आला आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. माजी आमदार अशोकराव काळे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी अभिनंदन केले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram