शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ५ नंबर साठवण तलावासाठी सर्वतोपरी मदत करणार - आशुतोष काळे

कोपरगाव शहराची पाण्याची समस्या अतिशय गंभीर आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांनी ४ नंबर साठवण तलावासाठी मंजूर करून आणलेला निधी राजकीय डावपेचांमुळे परत गेला ही कोपरगाव शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अतिशय वाईट गोष्ट घडली आहे. कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमचा निकाली लागावा अशी माझी प्रमाणिक इच्छा असून ५ नंबर साठवण तलावाच्या कामासाठी आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत करणार असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध शहर सेलच्या अध्यक्षांची निवड कार्यक्रम युवानेते आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत कोपरगाव येथे पार पडला याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे होते. ते पुढे म्हणाले की, कोपरगाव शहराचा दिवसेंदिवस वाढत चाललेला विस्तार व वाढणारी लोकसंख्या पाहता सद्य स्थितीत कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारे साठवण तलाव भविष्यात कोपरगावच्या नागरीकांची तहान भागवू शकणार नाही. ही जाणीव नेहमी डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांनाही नागरिकांना नळाद्वारे नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी कोपरगाव शहराच्या पाणी साठवण तलाव क्रमांक चार साठी मोठया कष्टाने सव्वा दोन कोटी रुपये निधी मंजूर करून आणला होता. परंतु कोपरगाव शहराच्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नाचे राजकारण करून शहरवासियांना पाण्यापासून वंचित ठेवले हि अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. कोपरगाव शहराच्या विकासात कोणीही राजकारण आणू नये प्रामाणिकपणे विकासासाठी प्रयत्न केल्यास कोणत्याही गोष्टी अशक्य नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी न घाबरता जनहीताचे कामे करावी. समाजकारण करीत असतांना मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. यावेळी त्यांच्या हस्ते कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या निवडी करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष सुनिल गंगुले, दत्तोबा गवारे, सुनील बोरा, नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, सौ.प्रतिभा शिलेदार, सौ.माधवी वाकचौरे, सौ.वर्षा कहार, अजीज शेख, नवाज कुरेशी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, वकील सेल अध्यक्ष विद्यासागर शिंदे, डॉ.सेल अध्यक्ष तुषार गलांडे, ओबीसी सेल अध्यक्ष राहुल देवळालीकर, सामाजिक न्याय सेल अध्यक्ष रावसाहेब साठे, सोशल मिडिया सेल अध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष अंबादास वडांगळे, बाळासाहेब रुईकर, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष जावेद शेख, माजी नगरसेवक संतोष चवंडके, दिनार कुदळे, कृष्णा आढाव, फाकीरमामू कुरेशी, मायादेवी खरे, सतीष शिंदे, अड.मनोज कडू, विद्यार्थी कार्याध्यक्ष निखील डांगे, स्वप्नील पवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram